पुणे : शहरात खुन, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, वाहनचोरी अशा सर्व गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मोठी घट झाली आहे. संचारबंदीमुळे पोलीस २४ तास रस्त्यावर असल्याने तसेच सर्व जण घरातच असल्याने शहरातील गुन्हेगारी जवळजवळ शुन्यांवर आली आहे. विवाहितेचा छळ, जबरी चोरी आणि दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.गेल्या तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिसांचा रस्त्यावरील वावर वाढला असून सातत्याने गुन्हेगारांवर वॉच ठेवला जात असल्यामुळे गुन्ह्यांचा हा आलेख खाली आला आहे. हे डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये तसेच जानेवारी महिन्यात सीएए व एनआरसी विरोधात शहरात दर आठवड्याला एक मोठा मोर्चा आयोजित करण्यात येत होता. देशभरात सीएए व एनआरसी विरोधातील मोचार्ला गालबोट लागून मोठा हिंसाचार झाला होता. त्यामुळे या मोर्चाच्या काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गुन्हेगारांना संधी मिळू नये, म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक केली होती. रात्रंदिवस मोर्च्याच्या बंदोबस्ताची आखणी करण्यात येत होती. त्यात २६ जानेवारीचा बंदोबस्तही होता. याशिवाय होळी, रंगपंचमी हे सण होते. त्यामुळे शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त होता. सहाजिकच गुन्ह्यांचे प्रमाण घटले होते.त्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे अगोदर जमाव बंदी आणि त्यानंतर आता संचारबंदी लागू आहे.लोक घरातच असल्याने घरफोडीचे गुन्हे जवळपास बंद झाले आहेत. त्याचेळी चौकाचौकात टोळक्याने उभे राहणे एकदम बंद झाले. त्यामुळे एकमेकांकडे बघण्यावरुन व दारुच्या नशेत भांडणे होऊन एकमेकांना भोसकण्यापर्यंतच्या गुन्ह्यांना चाप लागला आहे. रस्त्यावरील वर्दळच बंद झाल्याने व लोकांची सर्व वाहने त्यांच्या घराबाहेर पार्क आहेत. कोणी चोरण्याचा प्रयत्न केला तर चौका चौकात लागलेल्या नाकाबंदीमध्ये ते अपसूकपणे पोलिसांच्या हातात सापडतील, हे लक्षात घेऊन सर्व वाहनचोरही अंडरग्राऊंड झाले आहेत. संचारबंदीच्या काळात शहरातील सर्वच पोलीस २४ तास रस्त्यावर असल्याने गुन्हे घडण्याचे प्रमाण जवळपास शुन्यावर आले आहेत.संचारबंदीचा हा एक फायदा झाला आहे. गेल्या तीन महिन्यांतील दाखल गुन्हे प्रकार (मार्चअखेर) २०२० २०१९ (मार्चअखेर) खुन १४ २३ खुनाचा प्रयत्न २४ २७ चेन स्रचिंग ४ ४ मोबाईल चोरी ९ २६ इतर जबरी चोरी २२ १६ घरफोडी ९४ १११ गर्दी मारामारी ४६ ३८ दुखापत २५५ २०६ विवाहितेचा क्रुर ९४ ८२ वागणूक देणे बलात्कार ३६ ५८ विनयभंग १०१ १११ विश्वासघात १८३ ३०७ अपहरण १५३ १७९ चोरी २६१ ३०४ वाहन चोरी २५५ ४४९ प्राणघातक अपघात ५२ ५९ एकूण १८०२ २२७८
२०२० मधील तीन महिन्यात दाखल झालेले एकूण गुन्हेजानेवारी ६९९फेब्रुवारी ६३४