नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ज्वेलर्स दुकान फोडून दुकानातील वीस किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्यात आलीय आहे. नीरा येथील भर बाजारपेठे मध्ये असलेल्या अभिजित ज्वेलर्स हे दुकान रात्रीच्या वेळी फोडण्यात आले आहे. दिवाळीचा हंगाम असल्याकारणाने या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने - चांदीचेदागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यातील सुमारे २० किलो चांदीचे दागिनेचोरीला गेल्याची माहिती दुकान मालक विजयकुमार मैढ यांनी दिली आहे.
आज सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर नीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून. पोलीस पंचनामा करत आहेत. दरम्यान यामध्ये २० किलो चांदीचे दागिने चोरीला गेले असून. चोरांना तिजोरी फोडता आली नसल्याने सोन्याचे दागिने मात्र सुरक्षित राहिले असल्याची माहिती दुकानदार विजयकुमार यांनी दिली आहे. तिजोरीमुळे सोन्याचे दागिने वाचले असले तरी दुकानदाराचे वीस किलो चांदी चोरीला गेले असल्याने त्याचे जवळपास १९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चोरांनी शटरचा दरवाजा उघडून आत मध्ये प्रवेश केला. आणि यानंतर चांदीचे दागिने चोरून नेले. त्याचबरोबर चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर देखील चोरून नेला आहे. तसेच शेजारील हॉटेल व्यावसायिकाच्या दुकान बाहेरील सिसीटीव्ही कॅमेरांची ही तोडफोड केली आहे. त्यामुळे या चोरांचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभा राहिलं आहे. ऐन सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढल्याने लोकांनी चिंता व्यक्त केली आहे.
या वर्षभरात नीरा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात सुमारे ७० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. बंद घरांची कुलपे तोडून वीस ठिकाणी चोऱ्या झाली आहेत. व्यावसायिकांच्या ही किरकोळ चोरीची प्रकरणे दाखल आहेत. परिसरातील विहिरींनवरील व कालव्यावरील मोटार चोरीचे प्रमाणही वाढले आहे. यापैकी एकही चोरी उघडकीस आली नसल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.