जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल लांडे यांनी कुकडेश्वरास पूजा अभिषेक करून दर्शनाचा लाभ घेतला. कोरोनाचे संकट असल्याने यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले नाही. परंतु, प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या भजनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी हाती वीणा घेत व अमोल लांडे हे गळ्यात टाळ घेत भजनात रममाण झाले. आदिवासी भागातील उच्चील, खिरेश्वर येथील नागेश्वर, पिंपळगाव सिद्धनाथ येथील पाताळेश्वर, जुन्नरमधील, पंचलिंग, उत्तरेश्वर, नर्मदेश्वर मंदिरात थोड्या प्रमाणात का होईना भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.
फोटो : महाशिवरात्रीच्या औचित्याने जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल लांडे यांनी कुकडेश्वराचे दर्शन घेतले.