शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

Pune: शहरातून एकाचवेळी ४२ सराईत गुन्हेगार तडीपार; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

By नम्रता फडणीस | Published: April 23, 2024 2:49 PM

गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करत शहरात धुमाकूळ होता

पुणे : गेल्या काही दिवसात शहर परिसरात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व वाढत चालले आहे. यात र्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून  परिमंडळ पाचमध्ये कडे पाहिले जात असल्याने या परिमंडळातील सात पोलीस ठाण्यामधील  ४२ सराईत गुन्हेगारांना पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये ४ टोळी प्रमुखांचा समावेश असून,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.        शहरातील पोलीस ठाण्याची पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. परिमंडळ पाचमधील कोंढवा, मुंढवा, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, वानवडी आणि लोणी काळभोर या भागात गुन्हेगारांचा उपद्रव मोठा आहे. शहरात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगचा विषय राज्यभर गाजला. या कारवाईची सुरुवात  ही हडपसरमधून झाली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतील गुन्हेगारीवृत्तीला आळा घालणे व प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक व ठोस कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार परिमंडळ पाचमधील हडपसर विभाग व वानवडी विभागांचे अधिपत्याखाली येणाऱ्या वेगवेगळयां पोलीस स्टेशन कडील सराईत गुन्हेगारांच्या अभिलेखाचा अभ्यांस करण्यात आला. त्यावरून परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शाखाली ४२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकSocialसामाजिक