शहरं
Join us  
Trending Stories
1
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
2
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
3
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
5
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
6
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
7
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
8
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
9
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
10
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
11
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
12
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
13
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
14
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
15
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
16
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
17
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
18
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
19
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
20
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना मिळाले आयुष्याचे जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 7:40 PM

ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा नुकताच थाटात साखरपुडा पार पडला

पुणे : संपूर्ण जगभर अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा नुकताच थाटात साखरपुडा पार पडला. हयातीत असतानां त्यांनी आपल्या सोन्यासारख्या मानस कन्यांचे थाटात लग्न पार पडावे असं स्वप्न बघितलं होत. आज त्या नाहीयेत मात्र ममता बाल सदनने त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

मुलगी उपवर झाली की आईच्या मनाला तिच्या लग्नाचे वेध लागतात. पुढच्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी तिला अनुरूप साथीदाराची गरज आहे हे जाणवतं. तरी त्याचबरोबर एकीकडे मन खूप हळवं बनते. असच काही माईंचं झालं होत. लहानाचं मोठं सांभाळलेल्या आपल्या लेकींना विवाहाच्या बंधनात अडकतांनाचे स्वप्न साकार होत आहे.  हे नियतीला मान्य नसले तरी आज त्यांच्या पश्चात ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत.

रविवारी कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये  ९ लेकींचा एकसाथ थाटात साखरपुडा पार पडला. परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. संस्थेच्या वतीने विधिवत पूजापाठसह साखरपुडाचे नियोजन करून उपवर मुलाला अंगठी, संपूर्ण पोशाख, श्रीफळ देऊन सोपस्कार पार पाडले. माईंच्या ९ मानस कन्यांच्या मामांनी उपवर मुलांच्या मामांचे संस्कुतीप्रमाणे कुमकुम तिलक लावून श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.

यावेळी आमदार संजय जगताप यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनी जगताप, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे, पंचायत समिती सदस्य सुनीताताई कोलते, चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथील डॉ. वांढेकर, डॉ. वाघोलीकर, डॉ. रावळ, कुंभारवळणचे सरपंच अश्विनी खळदकर, माजी सरपंच अमोल कामठे, देविदास कामठे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मुलींना आशीर्वाद दिले.

टॅग्स :PuneपुणेSindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळ