लोणावळा : गावठी कठ्ठा घेऊन लोणावळ्यात आलेल्यस एका इसमाला लोणावळा शहर पोलिसांनी पाठलाग करत पकडले. त्यांच्याकडील गावठी कठ्ठा (पिस्टल) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. अंकुश ज्ञानदेव लोखंडे (वय- 22 वर्ष रा.गुरव वस्ती, ओळकाईवाडी, लोणावळा, ता.मावळ जि पुणे) असे या इसमाचे नाव आहे. आरोपीला पकडताना पोलिसांनी सिनेस्टाईलच आरोपीचा पाठलागल केल्याचं दिसून आल.
लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांना लोणावळा शहरात एक इसम बेकायदा गावठी कट्टा बाळगून फिरत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस काँन्स्टेबल अजीज मेस्त्री, राजेंद्र मदने, पवन कराड, मनोज मोरे यांनी संशयित इसमाचा शोध घेतला असता, रायवूड गार्डन मधील सिद्धेश्वर मंदिराचे पाठीमागे तो संशयित रित्या थांबलेला दिसला. पोलीस पथकाने त्यास थांबणेस सांगितले असता, त्याने पोलिसांना पाहून पलायन केले, गुन्हे शोध पथकाचे जवानांनी देखिल फिल्मी स्टाइल पाठलाग करून पळणारे इसमास पकडून त्याची झडती घेतली असता, त्याच्या डावे कमरेस एक गावठी बनावटीचा कट्टा खोचलेला मिळून आला. पोलिसांनी सदर शस्त्र पंचनामा करुन जप्त केले आहे. लोखंडे हा गावठी कठ्ठा घेऊन लोणावळ्यात कशाकरिता आला होता, त्यांच्याकडे हे शस्त्र आले कोठून याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे करीत आहेत.