छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्येक किल्ला म्हणजे पराक्रम, शौर्य, शिस्तीचा इतिहास सांगणारा आहे, परंतु पर्यटकांमुळे किल्ल्यांवर अस्वस्थतेचे साम्राज्य निर्माण होत आहे. या वास्तूचे पावित्र्य राखले जावे, तसेच तेथील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जोपासला जावा या उद्देशाने ही स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होत असते, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सिंहगडवर देखील मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता अभियानामध्ये उपाध्यक्ष हेमेंद्र जोशी, महेश भोसले, अभिषेक तापकीर, तुषार कुटे, सचिन मणेरे, किरण हगवणे, संजय वर्मा, पश्चिम हवेलीचे अध्यक्ष अनिरुद्ध यादव, दीपक रजपूत, बाजीराव पारगे, शरद गुजर, अतुल चाकणकर, स्वप्निल क्षीरसागर, शुभम भोंगळे, मुक्ता पुंडे, दीपा परब, विशाल बोडके, रोहन जाधव, अक्षय भरते, संकेत बिरामणे, ओंकार डवरी व मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आले होते.