पुणे : निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंहगड व्हॅली परिसरातील कचरा, प्लॅस्टिक, रिकाम्या बाटल्या, चॉकलेटचे रॅपर पसरलेले पाहून मन विषण्ण झालेल्या युवकांनी संकल्प केला, तो हा सर्व परिसर स्वच्छ करण्याचा. नितीन जिराफे हे स्पर्श या सेवाभावी ग्रुपचे सदस्य एका शनिवारी फोटोग्राफी करायला गेले होते. त्या वेळी त्यांना सिंहगड व्हॅली परिसरातील अस्वच्छता आणि सिंहगडावर येणाऱ्या नागरिकांच्या विकृतीचे दर्शन घडले. त्यातूनच पर्यावरण रक्षणासाठी काही केले पाहिजे, या हेतूने ललित देशमुख यांना साद घातली. यातून इम्प्रेशन ग्रुपचे काही सदस्य एकत्र आले आणि त्यांनी सर्व परिसर स्वच्छ केला. ३ तासांत जवळपास २० पिशव्या भरून कचरा गोळा करण्यात आला. तो कचरा डेपोमध्ये जमा केला गेला. (प्रतिनिधी)
सिंहगड व्हॅली केली चकाचक
By admin | Published: January 14, 2017 3:33 AM