शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सिंहगड रस्ता जळीतकांडाची सर्वसामान्यांनाच धग

By admin | Published: June 29, 2015 6:57 AM

एरवी शांत असलेला सिंहगड रस्ता परिसर आता खून, मारामाऱ्या, चोऱ्या, बलात्कार, साखळी चोऱ्यांच्या घटनांमुळे प्रकाशझोतात आला आहे.

पुणे / सिंहगड रस्ता : एरवी शांत असलेला सिंहगड रस्ता परिसर आता खून, मारामाऱ्या, चोऱ्या, बलात्कार, साखळी चोऱ्यांच्या घटनांमुळे प्रकाशझोतात आला आहे. अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना रविवारी पहाटे सनसिटी रस्ता परिसरातील काही सोसायट्यांमधील दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सिंहगड रस्ता, दत्तवाडी व ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात येत असून, भुरट्या चोऱ्या, खून व खंडण्यांच्या प्रकारामुळे परिसराची परिस्थिती पूर्वीपेक्षा बदलली आहे. सहा आसनी, तीन आसनी पॅगो वाहतुकीच्या व्यवसायातून अनेक पुढारी नेतृत्वासाठी आसुसले आहेत. राजकारणी व बांधकाम व्यावसायिकांनी बेरोजगार पोरांना आशेला लावून आपले बस्तान बसविले आहे. पोलिसांचा दबदबा राहिला नसल्याने टोळीयुद्धातून वर्चस्वासाठी जो तो प्रयत्न करत आहे. सिंहगड रस्ता परिसरही सर्वसामान्यांसाठी असुरक्षित होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी वेळीच पावले उचलून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर पोलिसांना सर्वसामान्य जनता आरोपांच्या पिंजऱ्यात उभी केल्याशिवाय राहणार नाही.अक्षय ग्लोरीतील घटनेबाबत रहिवासी राहुल कामठे यांनी सांगितले, की मध्यरात्री सोसायटीत काहीसा आवाज जाणवला. मात्र, शेजारील इमारतीतून कशाचा तरी आवाज झाला असावा, असे वाटल्याने आपण थोडे दुर्लक्ष केले. घटनेची माहिती मिळताच आमदार भीमराव तापकीर, श्याम देशपांडे, सचिन तावरे, अभय छाजेड, राजाभाऊ लायगुडे, युगंधरा चाकणकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती. हरिदास चरवड यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात निवेदन देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.कशी लावली आग?सलग सुट्या असल्याने पहाटेच्या वेळी वर्दळ नव्हती. तीनच्या सुमारास डॉमिनोज पिझ्झाजवळ घुटमळणाऱ्या तरुणाने तेथे पार्क केलेल्या दुचाकींपैकी एकीचे पेट्रोलचे पाईप तोडून काडीने दुचाकी पेटवून दिली.सर्वांत मोठी घटना गॅँगवॉर, खुन्नस, वादविवाद यातून आजपर्यंत भारती विद्यापीठ, दत्तवाडी, कोथरूड, पिंपरी, येरवडा, हडपसर या भागांमध्ये गाड्यांची तोडफोड करणे किंवा पेटवण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये २० ते २५ गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, आज घडलेल्या घटनेमध्ये माथेफिरूने तब्बल ९२ गाड्या पेटवून दिल्या आहेत. तसेच, दुकाने आणि इमारतींचेही नुकसान झाले आहे.सिंहगड रोड, सनसिटी रोड आणि नऱ्हे परिसरात घडलेल्या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. यासाठी विशेष तपास पथके तयार केली असून, घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना कोणी माथेफिरूने केली की कोणत्या वादातून झाली? याबाबतची माहिती सखोल तपास केल्यावरच समोर येईल. - के. के. पाठक, पोलीस आयुक्तहार्ड डिस्क पोलिसांकडे अवधूत आर्केडमधील डॉ. सुनील धनवडे म्हणाले, की आमच्या सोसायटीत सीसीटीव्ही आहे, त्यालाही आगीची झळ पोचली आहे. पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क दिली आहे. स्वामी नारायण सोसायटीतील वासंती रावेतकर म्हणाल्या, की धूर नाका-तोंडात गेल्याने खूप त्रास होत होता.