शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

साहेब, तुमचं ऐकतो, पण मारता कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 2:39 PM

घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

ठळक मुद्देनियमांचे पालन करतो, विनाकारण लाठीचार्ज करू नका

पुणे : कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाकडून जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. रस्त्यावर कुणीही फिरकू  नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र तरीही काही महत्त्वाच्या कामांकरिता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलीस लाठीचार्ज करीत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यात प्रसारमाध्यमांत काम करणाऱ्या व्यक्तींना देखील पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला आहे. शहरातील सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन बस स्टॉप याशिवाय लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता या प्रमुख रस्त्यांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडून वाहतूकदारांवर हात उगारला जात असल्याने त्याबद्दल उलट - सुलट चर्चेला उधाण आले आहे. या सगळयात नागरिकांकडून पोलिसांना विनंती करण्यात येत आहे. त्यात ‘साहेब तुमचं ऐकतो, पण मारता कशाला?’ असे म्हणून नागरिक विनवणी करीत आहेत. रविवारी रात्री जनता कर्फ्यूला पुणेकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट होता. पुढे प्रशासनाने पहाटे पाचपर्यंत त्याची मुदत वाढवल्याने त्यालादेखील नागरिकांनी सहकार्य केले. पोलीस प्रशासनाकडून संचार व जमावबंदी लागू करण्याचे आदेश जाहीर झाल्यानंतर त्यावर कडक अंमलबजावणीचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करताना त्यांनी नागरिकांना समज देण्याऐवजी मारण्यास सुरुवात केल्याचे दृश्य सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. .........

काहीही न विचारता थेट काठीने मारहाण केली नागरिक महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडले होते. अशा वेळी पोलिसांनी त्यांना अडवून काहीही न विचारता थेट काठीने मारहाण केली आहे, अशी तक्रार अनेक नागरिकांनी ‘लोकमत’कडे दूरध्वनीद्वारे केली आहे. पोलीस उपायुक्तांनी पोलीस कर्मचाºयांना लाठीचार्ज करू नका, असे सांगितल्यानंतरदेखील त्यांच्याकडून तो सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या शहरातील सर्वच रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली असून येणाºया-जाणाºया वाहतूकदारांना समज देऊन जाऊ न देता फटके मारण्यावर भर दिला जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी