शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
2
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
3
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
4
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
5
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
6
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
7
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
8
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
9
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
10
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
11
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
12
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
13
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
14
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
15
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
16
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
17
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
18
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
19
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
20
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा

साहब... स्कूल कै से जाएंगे?

By admin | Published: July 09, 2015 2:12 AM

वेळ सकाळी आठची... बारामतीकरांचे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे सुरू होते.. त्यातच इंदापूर चौकात दोन बांबूंवर बांधलेल्या दोरीवरील एका बालिकेच्या कसरती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या

बारामती : वेळ सकाळी आठची... बारामतीकरांचे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे सुरू होते.. त्यातच इंदापूर चौकात दोन बांबूंवर बांधलेल्या दोरीवरील एका बालिकेच्या कसरती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या... ते पाहून काही बारामतीकरांची पाऊलेदेखील या ठिकाणी थबकली... अजाणत्या वयात शाळा सोडून या मुलीला जीवघेण्या कसरती कशाला करायला सांगतो, असा सवाल या वेळी डोंबारी युवकाला नागरिकांनी विचारला. त्यावर ‘पेट का सवाल है, साहब... स्कूल कै से जाएंगे, काम तो करना पडता है’ या मिळालेल्या उत्तराने बारामतीकर निरुत्तर होऊन मार्गस्थ झाले. शहरात एकीकडे शालाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र, डोंबारी खेळ करून कसरत करणारी, लहान वयातच अंग मेहनतीचे जीवघेणे खेळ करून अर्थार्जन करणारी ही बालिका सर्वेक्षणापासून दूरच आहे. याच दरम्यान अजाणत्या वयात कुटुंब प्रमुखाप्रमाणे कसरती करून अर्थार्जन करणारी बालिका बारामती शहरात चर्चेचा विषय बनली होती. सोशल मीडिया, डिजिटल युगात सर्वच खेळ, कलांपासून प्रेक्षक दुरावला आहे. डोंबाऱ्याचा खेळ असाच कसरतीचा. या खेळाला ग्रामीण भागातील आठवडे बाजार, यात्रांमधून मोठा प्रेक्षक वर्ग लाभला होता. अनेक दिवसांपासून हा खेळ दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, बुधवारी (दि. ८) छत्तीसगड येथील परराज्यातील डोंबारी कुटुंबाने भल्या सकाळीच येथे त्यांचा खेळ सुरू केला. दोन्ही बाजूने बांबूला बांधलेल्या दोरीवर ७ ते ८ फुटांवरून बांबूच्या साह्याने ‘बॅलन्स’ करीत चिमुरडीने कसरती सुरू केल्या. डोक्यावर तांब्या ठेवून चालणे, पायात चप्पल घालून दोरीवरून चालणे, सायकलची रिंग घेऊन चालणे, दोरीवर ठेवलेल्या थाळीत गुडघे टेकवून पुढे सरकणे आदी कसरती पाहून बारामतीकर शहारले. एका बारामतीकराने मुलीचे वय काय, ती शाळेत जात नाही का, असे त्या व्यावसायिकाला विचारले. त्यावर ‘वह स्कूल जाती है, साहब. पेट के लिए काम करना पडता है... स्कूलसे छुट्टी लेकर आए है’ असे सांगितले. त्यावर तो बारामतीकर नागरिक निरूत्तर झाला. त्यानंतर पुन्हा ‘बॅलन्स’ का कमाल, बॅलन्स का खेल, अशी आरोळी देत पुन्हा त्यांचा खेळ सुरू झाला.(प्रतिनिधी)> शहरात एकीकडे शालाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र, डोंबारी खेळ करून कसरत करणारी, लहान वयातच अंगमेहनतीचे जीवघेणे खेळ करून अर्थार्जन करणारी ही बालिका सर्वेक्षणापासून दूरच आहे