यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे, योगेश मोकाटे, संजय निम्हण, संतोष तोंडे, अमित रणपिसे आदी राम थरकुडे, दिनेश नाथ, हृषीकेश कुलकर्णी उपस्थित होते.
सुतारवाडी परिसरामध्ये जंतूसंसर्ग असलेले दूषित पाणी पुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणी पुरवठा अधिकारी कारवाई करत नाहीत.
यावेळी पाणी प्रश्न सोडविण्यात यावा म्हणून शहर प्रमुख व गटनेते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तीन वरिष्ठ अभियंत्यांची विशेष टीम तयार करून हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, सुतारवाडी येथील दूषित पाणीप्रश्न हा नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे. दूषित पाणी पुरवठा तातडीने दुरुस्त करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा मिळाला पाहिजे. शिवसेनेच्यावतीने महानगरपालिका पुरवत असलेल्या पाणीपुरवठ्याचे टेस्टिंग करून रिपोर्टदेखील आयुक्तांना देण्यात आले आहेत.