राजगुरूनगर : रेटवडी (ता खेड ) येथे विजेचा शॉक लागुन २७ वर्षीय युवकाचा जागीच मुत्यु झाला आहे. योगेश शामराव देशमुख ( रा. वरची ठाकरवाडी, रेटवडी ,ता खेड ) असे मूत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे. हि घटना शनिवारी रात्री ९ वाजता घडली. वरची ठाकरवाडी येथे नवीन घरात टिव्ही बसविण्याचे काम योगेश करत होता. टिव्हीच्या वीजपुरवठ्याची वायर चेक करत असताना त्याला जोरदार वीजेचा शॉक बसला. त्यामुळे तो जागीच कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. होलेवाडी येथे एका कंपनीत योगेश कामास होता. योगेशच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, आईवडील आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेची खेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सचिन गिलबिले करीत आहे.
टिव्हीच्या वीजपुरवठ्याची वायर चेक करताना बसला शॉक; २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मुत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:25 PM