लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेकडून २०३१ सालाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन पुणे पार्किंग धोरण आखले गेले असले तरी, सध्यातरी शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्याशिवाय रस्त्यांवरील पार्किंग होणाऱ्या वाहनांच्या रांगाचे चित्र जैसे थेच राहणार हे स्पष्ट आहे़
पुणे शहरातील बहुतांशी सधन कुटुंबात आज दोन-तीन दुचाकी व एखादी चारचाकी हे समीकरण ठरलेले आहे़ अशावेळी त्या कुटुंबांच्या सदनिकेसाठी दिलेली पार्किंग जागाही अपुरी पडते़ तर मध्यवर्ती भागात व दाटवस्तीच्या भागातही वाहनांची संख्या एक-एका घरात व्यक्तीमागे एक झाल्याने, प्रत्येक भागातील रस्ते हे वाहनांच्या पार्किंगने फुल्ल झाले आहेत़
पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे जून २०२१ पर्यंत शहरात ‘एमएच १२’ अंतर्गत ३१ लाख ५३ हजार ४५३ वाहनांची नोंद झाली आहे़ सन २०१९ वर्षांच्या तुलनेत या वर्षात कोरोनामुळे नवीन वाहन खेरदीत ३९ टक्क्यांनी घट झाली आहे़ मात्र आता ही घट मोठ्या प्रमाणात भरताना दिसून येत असून, बाजारात नव्या-जुन्या गाड्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांनी जोर धरला आहे़
पुणे शहरात केवळ ‘एमएच १२’ अंतर्गत वाहने नसून, पुण्याबाहेरील ज्या व्यक्ती नोकरीसाठी स्थायिक झाल्या आहेत, त्यांच्याकडील वाहनांची संख्याही दुर्लक्षित करता येणार नाही़ यामुळे पुणे शहरात आजमितीला दुचाकी व चारचाकी मिळून साधारणत: ३५ लाखांच्या पुढे वाहनांची संख्या आहे़
----------------------------
रस्ते दळणवळणासाठी की पार्किंगसाठी
शहरातील मध्यवर्ती भागातील पेठा, गल्ल्या, वस्त्यांमधील रस्त्यांमध्ये आजमितीला ज्याला जेथे मोकळी जागा मिळेल तेथे चारचाकी, दुचाकी गाडीचे पार्किंग केले जात आहे़ या पार्किंगमुळे नागरिकांमधील आपआपसात वादही शहरात बहुतांशी ठिकाण नित्याचे झाले आहेत़ शहरातील हीच स्थिती उपनगरांमध्ये आहे़ महापालिका हद्दीत ३४ गावे जाहीर होणार असे जाहीर झाल्यावर, प्रारंभी ११ गावे घेतली गेली़ परंतु, उर्वरित २३ गावांमध्ये मध्यंतरीच्या काळात गुंठेवारीतील बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली़ अगदी एकमेकांच्या भिंतीही कॉमन राहिल्या़ तर एक हजार स्वेअर फूटामध्ये तीन-तीन मजली इमले उभे राहिले आहेत़ या सर्व रहिवाशांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या मात्र या भागातील अपु-या रस्त्यांवर लावल्या जात असल्याने, या भागांमध्ये अनेकदा वाहतुकीची समस्या वारंवार तोंड वर काढत आहे़
------------------------
फोटो तन्मयच्या फोल्डरमध्ये आहेत़????????????