खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,
खरपुडी खुर्द गावचे हद्दीत नवीन मराठी शाळेचे बांधकाम चालू असलेल्या मोकळया खोलीमध्ये काही लोक सध्या महाराष्ट्रामध्ये शासनाने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी केली असतानाही, दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून व कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे हे माहीत असताना देखील तीन पत्ते नावाची जुगार खेळत आहे. हवालदार सचिन जतकर, शेखर भोईर ,स्वप्रील गाढवे, निखील गिरीगोसावी यांनी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्यांना अटक करून जुगारीचे साहित्य व रोख रक्कम ४ हजार ९०० रुपये पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार सचिन जतकर यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.