पुणे: मुंबई-बंगळूर महामार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पहाटेच्या सुमारास राजगड पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आरोपीजवळ असलेल्या सॅकमध्ये पोलिसांना तब्बल सहा किलो चरस सापडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चरसची कोट्यवधी रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई ते गोवा या मार्गावर धावणाऱ्या डॉल्फिन ट्रॅव्हल्स मधून एक व्यक्ती चरस घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्यावर ट्रॅव्हल्स अडवून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या सॅकमध्ये पोलिसांना तब्बल सहा किलो चरस पोलिसांंना आढळून आले आहे.