नारायणगाव - महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित ठेवलेल्या जुन्नर तालुक्याला दिलासा मिळाला असून राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके व २६८ मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील ६ मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केली आहेत. तर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या पट्यातील मुख्य पीक असलेल्या भात शेतीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. भात शेतीला नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल अशी माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली .राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या पहिल्या टप्यात १५१ तालुक्यांमध्ये जुन्नर तालुक्याचे नाव नसल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. जुन्नर तालुका दुष्काळी घोषित होण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तालुक्यातील पावसाची परिस्थिती व पडलेला दुष्काळ याची सविस्तर माहिती देऊन दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचीव बाबींची शहानिशा करून या समितीने जुन्नर, नारायणगाव, बेल्हे, निमगावसावा, ओतूर व वडगाव या ६ मंडळांमध्ये दुष्काळ केला जाहीर केला आहे.केंद्र सरकारच्या ३ पद्धती मध्ये जे तालुके बसले ते तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले. अद्याप ज्या महसुली मंडळांमध्ये ७५० मी. ली. मीटर पेक्षा कमी पाऊस झालेले २६८ मंडल ६ नोव्हेंबर २०१८ ला शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केली. जे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले नाही. त्यांच्या संबधीत माहिती साठी व पुढील प्रकिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती तयार करून दुष्काळ संदर्भात तक्रारी असतील किंवा तांत्रिक बाबीमुळे दुष्काळ जाहीर करण्याचे राहिले असेल तर त्या संबधी त्याची शहानिशा करून समिती त्या विभागाला दुष्काळी घोषित करणार होती. समितीकडे परिस्थिती व पावसाची टक्केवारी सविस्तर अहवाल सादर करून यशस्वीरित्या मांडली. समितीने अहवाल आधार घेत दुसºया टप्प्यात जुन्नर तालुक्यातील ६ मंडळे दुष्काळ भाग म्हणून जाहीर केले.९ पैकी तांबे, पाडळी, राजूर या ३ मंडळात ७५० मी. ली. मीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ही मंडळे धरण क्षेत्रात येत आल्याने ती निकषा प्रमाणे दुष्काळ ग्रस्त भागात येत नाहीत. त्यामुळे हि ३ मंडळे जाहीर झाली नाहीत. मात्र या भागात मुख्य असलेले भात पिकाचे पंचनामे केले आहे. त्याप्रमाणे शासनाकडून भात शेतीला नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे अशी माहिती आमदार सोनवणे यांनी दिली.
जुन्नरमधील सहा मंडलांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश, आमदार सोनवणे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 12:54 AM