पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण स्वाइन फ्लू संसर्ग वाढत आहे. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यात स्वाइन फ्लू संसर्ग झालेले ८६ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, हवेली तालुक्यातील (६ मृत्यू) रुग्णांची संख्या अधिक आहे.मागील आठ महिन्यात पुणे जिल्ह्यात ८६ जणांना स्वाइन फ्लू संसर्ग झाला आहे. तर त्यापैकी २४ जणांचा यामुळे मृत्यू झाले आहेत. परिणामी, जिल्ह्यात स्वाइन फ्लू संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने तेरा तालुक्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यामातून नागरिकांमध्ये जाणीवजागृती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सहा महिन्यांत २४ जण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:44 AM