शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

उजनी धरणाचे सोळा दरवाजे उघडले; धरण १०० टक्के भरले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 2:55 PM

भीमा खोरे व घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाने दौंड व बंडगार्डनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत चालली आहे.

ठळक मुद्देसर्व उपसा सिंचन कार्यान्वित : उजनी धरण भरल्यामुळे सोलापुरला फायदा होणारसद्यस्थितीतीत पाणी सोडण्यात येत असल्याने अनेक योजनांना मिळाले जीवदान

इंदापूर :  जिल्ह्यातील खडकवासला धरणसाखळीमध्ये व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे उजनीत प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे उजनी धरण फुल्ल झाले आहे. धरणातील वाढते पाणी बघता रविवारी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून, भीमा नदीमध्ये जवळपास ७० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भीमा खोरे व घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाने दौंड व बंडगार्डनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत चालली आहे. रविवारी सकाळपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे सकाळी ६ वाजता ४५ हजार, १० वाजता ५० हजार, ११ वाजता ५५ हजार, १२.३०  वाजता ६० हजार, ३ वाजता ६५ हजार तर सायंकाळी ५ वाजता ७० हजार क्युसेकने पाणी उजनीतून पुढे सोडण्यात आले आहे. यामुळे उजनीतून भीमेत ७० हजार क्युसेक पाणी व सांडव्यातून, तर १६०० क्युसेक पाणी वीजनिर्मितीसाठी सोडले जात आहे. यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नीरा साखळी धरणांवर पावसाचा जोर असल्याने वीर धरणातून काल १३ हजार व नंतर सायंकाळी ५५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. वीर व उजनीच्या पाण्याने भीमा नदी संगमच्या पुढे ७६०० हजार क्युसेकने वाहण्याची शक्यता असल्याने सर्व बंधारे व पंढरीतील दगडी पूल पाण्याखाली जाईल. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने येथे पाणी साठवणूक करण्यास जागा राहिली नाही. परिणामी सर्व उपसा सिचंन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उजनीच्या अधिकाºयांनी दिली. ............उजनी धरण भरल्यामुळे सोलापुरला फायदा होणार आहे. सद्यस्थितीतीत पाणी सोडण्यात येत असल्याने अनेक योजनांना जीवदान मिळाले आहे..............पाण्याअभावी उजनीकाठची अनेक पिके संकटात आली होती. या भागात पुरेसा पाऊसही झालेला नाही. मात्र, धरण भरल्यामुळे यावर्षी पाणीटंचाई जाणवणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीUjine Damउजनी धरणriverनदी