शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

पारंपारिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक : अरूण फिरोदिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 1:38 PM

कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आयटी करिअर्स २०२०++’ या पुस्तकाचे प्रकाशनअरुण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकॉमन सेन्स सोबत स्किल सेन्स देखील विकसित असणे गरजेचे : फिरोदिया भविष्यात चोरांना चोरी जरी करायची झाल्यास त्याला आधी संगणक शिकावे लागेल : शिकारपूर

पुणे : एक पदवी संपादीत केली आणि त्या पदवीच्या ज्ञानाच्या आधारावर तुमचे पुढील आयुष्य सुखकर होईल हे दिवस गेले असून, आज स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर परकीय भाषांसह कौशल्याधिष्ठित शिक्षण घेणे क्रमप्राप्त झाले असल्याचे डॉ. अरुण फिरोदिया यांनी सांगितले. कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आयटी करिअर्स २०२०++’ या पुस्तकाचे प्रकाशनअरुण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी, कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या संचालिका देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी, अनंत सरदेशमुख, लेखक डॉ. दीपक शिकारपूर आदी मान्यवर उपस्थित होते. फिरोदिया म्हणाले, एकविसावे शतक हे भारताचे असणार आहे, असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळीस एकविसाव्या शतकात वावरणारी पिढी ही तंत्रज्ञान आणि विज्ञानातून जन्माला येणाऱ्या ज्ञानावर पोसलेली पिढी असली पाहिजे. पांरपरिक शिक्षण हे आवश्यक आहेच. कारण एक सर्वसाधारण कॉमन सेन्स विकसित होण्यासाठी ते आवश्यक असते, परंतू त्या कॉमन सेन्स सोबत स्किल सेन्स देखील विकसित असणे गरजेचे आहे. जग हीच आपली बाजारपेठ असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात कौशल्य असणाऱ्यांनाच भविष्य असणार आहे. कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्या क्षेत्रात सर्वोत्तम होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनोज जोशी म्हणाले, की कोणतेही काम कमी किंवा मोठ्या दर्जाचे नसते, तर ते काम करणाऱ्या व्यक्तिच्या कौशल्यावर त्या कामाची गुणवत्ता ठरत असते. आणि तांत्रिक कौशल्याप्रमाणेच माणसाच्या स्वभावातील कौशल्ये त्या व्यक्तीच्या कामावर परिणाम करीत असतात. त्यामुळे या दोन्हीबाबत सजग असणारी व्यक्ती हमखास यशस्वी होते. डॉ. दीपक शिकारपूर यांनी आपण स्मार्ट उपकरणांचा व्यक्तिंच्या प्रयोजनासाठी उपयोग करणे अपेक्षित असतांना आज आपण आपल्या जवळच्या व्यक्तिंचा उपयोग करुन घेता आणि उपकरणांवर प्रेम करतो. आॅटोमेशन इतक्या झपाट्याने सर्वच क्षेत्रात होत आहे त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया ही निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया झाली आहे कॅशलेस व्यवहाराकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात चोरांना चोरी जरी करायची झाल्यास त्याला आधी संगणक शिकावे लागेल असे सांगितले. यावेळी कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या संचालिका देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी यांनी प्रकाशकिय मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Deepak Shikarpurदीपक शिकारपूरManoj Joshiमनोज जोशीPuneपुणे