पिंपरी : तळवडेतील कॅपजेमिनी कंपनीतील संगणक अभियंता अंतरा दास हत्याप्रकरणी न्यायालयाने ९0 दिवस झाले असतानाही आरोपपत्र दाखल न केल्याने पोलिसांना खडसावले असून, पोलिसांच्या कारवाईत दिरंगाईमुळे आरोपी संतोष कुमारला जामीन मंजूर झाला आहे. तळवडे एमआयडीसी परिसरात गेल्या वर्षी २३ डिसेंबरला भर रस्त्यात कॅपजेमिनी कंपनीतील संगणक अभियंता अंतरा दासची रात्री आठच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर देहूरोड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला होता. अंतराचे नातेवाईक, मित्र यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी संतोष कुमारला बंगळुरूतून अटक केली होती. संतोष हा मूळचा बिहारचा असून, तो बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत नोकरीस होता. याप्रकरणी मावळ तालुक्यातील वडगाव न्यायालयात सुनावणी सुरू होती.पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २७ मार्चला न्यायालयात सुनावणी झाली. नव्वद दिवस झाले असतानाही आरोपपत्र दाखल न केल्याने पोलिसांना खडसावले असून, आरोपी संतोष कुमारला जामीन केला. त्या वेळी नार्को टेस्टची तारीख न मिळाल्याने आरोपपत्र दाखल करण्यास विलंब झाल्याचे उत्तर पोलिसांनी न्यायालयात दिले.एकतर्फी प्रेमातून अंतरा बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. तेव्हापासून तो तिच्या संपर्कात होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता. तसेच त्याने अंतराला लग्नाची मागणीही घातली होती. मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. तसेच अंतरा पुण्यात कुणासोबत फिरते, तिच्यावर लक्ष ठेवण्याचे त्याने मित्रांनाही सांगितले होते.पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या सत्येंद्र शिंपी यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. (प्रतिनिधी)शिंपी यांनी दाखवली माणुसकी नेहमी कंपनीची कॅबने जाणारी अंतरा त्या दिवशी रात्री केएनबी चौकातून पायी जात होती. त्या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञाताने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला.अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या सत्येंद्र शिंपी यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.आरोपीच्या नार्को टेस्टची मागणीदास हत्येचा तपास सुरुवातीला देहूरोड पोलीस करत होते. मात्र, नंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. नार्को टेस्टसाठी एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेळ मिळणार आहे, अशी पोलिसांनी माहिती दिली.
दास खूनप्रकरणी फटकारले
By admin | Published: March 31, 2017 11:42 PM