सचिन कांकरियानारायणगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे संथ गतीने सुरू असलेले काम, अपघातप्रवण क्षेत्रात सूचनाफलकांचा अभाव, रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे पुणे-नाशिक मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या ८ महिन्यांमध्ये या मार्गावर २१ अपघात होऊन जवळपास ३१ जणांचा मृत्यू झाला आहे़पुणे ते नाशिक हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा रस्ता मानला जातो़ या मार्गावरील अपघातांच्या मालिकांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. नुकत्याच झालेल्या त्र्यंबकेश्वर-पुणे एसटीच्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले होते़ यातील अनेक जखमी आजही उपचार घेत आहेत़ राष्ट्रीय महामार्ग क्ऱ ५० असलेल्या या रस्त्याचे दुसºया टप्प्याचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे़ चौपदरीकरणापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६२ यांच्याकडे देखरेखीसाठी ठेवण्यात आला होता़ मात्र चौपदरीकरणाचे काम सुरू होण्याआधीच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आला़. खेड ते सिन्नर या दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. खेड ते चाळकवाडी ४९.३ कि़ मी़ चा रस्ता असून, त्यापैकी बाह्यवळणाचे २६.९ कि़ मी़ चे काम प्रलंबित आहे. काही भागांत काम सुरू आहे तर काही भागात ठप्प आहे़ सध्या वाहनचालक चौपदरीकरण असलेल्या २२.४ किमीने ये-जा करत आहेत, तर उर्वरित बाह्यवळण असलेले २६.९ किमी काम बाकी असल्याने जुन्या रस्त्याने प्रवाशांना प्रवास करावा लागतो. जुन्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वारंवार वाहनांचे अपघात होऊन अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले, तर शेकडो वाहनचालक अपघात होऊन ते जखमी झाले आहेत़ बºयाच वाहनचालकांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झालेले आहे़ दि. १ जानेवारी २०१७ पासून ते दि़ ३० आॅगस्ट २०१७ अखेर एकूण २१ अपघात होऊन ३१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे़ राष्ट्रीय महामार्गावर अनेक सुविधांचा अभाव असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे़ सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या महामार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत आहेत़ हा रस्ता दुरुस्त करण्याची तसदी राष्ट्रीय प्राधिकरण विभाग घेत नाही़ एसटी अपघातात ९ जणांचा बळी जाऊनदेखील अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही़ प्राधिकरणाने चाळकवाडी येथे टोलनाका सुरू करून दिला; परंतु अद्याप अनेक सुविधा दिलेल्या नाहीत़अपघात झाल्यास क्रेनची व्यवस्था तसेच अॅम्ब्युलन्स सुविधा टोलवर उपलब्ध नाही़ अपघात झाल्यास प्रवाशांना रुग्णालयात नेण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे़ असे असताना देखील दि़ २८ आॅगस्ट रोजी झालेल्या एसटी व आयशर टेम्पोच्या अपघातात टोलचालकाकडून कोणतीही सुविधा पुरविली गेली नाही़ याबाबत नागरिकांमध्य संताप व्यक्त होत आहे.साईडपट्ट्या खचल्याजुन्या रस्त्यालगत साईडपट्ट्या पावसामुळे निघून गेलेल्या आहेत. यामुळे देखील वारंवार अपघात होतात़ याकडे देखील राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष आहे़ ज्या भागात वारंवार अपघात घडतात, त्या भागात अपघात ठिकाणांची माहिती दर्शविणे आवश्यक आहे़ मात्र, याकडेदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनी यांचे दुर्लक्ष केले आहे. ८ महिन्यांमध्ये ३१ प्रवाशांचा मृत्यू होऊ नदेखील प्राधिकरण व टोलचालक रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे़ चाळकवाडीयेथील टोलनाका दि़ २१ फेब्रुवारी २०१७ पासून सुरू करण्यात आला. प्रवाशांना टोल भरावा लागतो. असे असताना प्रवाशांनी खड्डे असलेल्या रस्त्यासाठी टोल भरावा का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
महामार्ग चौपदरीकरणाचे संथ काम ठरतेय जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:49 AM