बेल्हा जेजुरी महामार्गाचे काम गेले अनेक दिवस सुरु असून बेल्हा पाबळ शिक्रापूर दरम्यान वन विभाग वगळता काहीसे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर मंगरूळ लाखणगाव, धुमाळ स्थळ, खडकवाडी ,लोणी पारगाव आदी भागात काहीसे कॉंक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. पाबळ येथील गावठाणातील रोडचे काम १४ मीटर करायचे का १८मीटर करायचे या वादात अडकले असून ग्रामपंचायतीने याबाबतचे पत्र संबंधित अधिकार्यांना दिले असून हा रोड १८ मीटर करण्याची मागणी केली आहे .या भागात गटार योजनेचे काम काहीसे पूर्ण झाले आहे . गेले दोन-तीन महिने रस्त्याला धुळीचे साम्राज्य प्रस्थापित होत आसून या रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
--
चौकट
--
पाबळमधून जाणारा बेल्हा जेजुरी महामार्ग राजकीय शासकीय खेळीत अडकला
पाबळ गावठाण रोड ठरल्या प्रमाणे १८ मीटर करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे तर काही ग्रामस्थ १४ मीटरची मागणी करत आहेत त्यातच शासकीय व संबंधित ठेकेदाराने काही भागत १४ मीटर प्रमाणे गटार योजनाचे काम केले आहे .या सर्व घोळात मात्र गेली काही दिवस नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. फोटो...शिरूर पाबळ (ता. शिरूर) येथे बेल्हा जेजुरी महामार्गाचे कामात संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रहदारी साठी अडथळे निर्माण होत आहे (