शहरं
Join us  
Trending Stories
1
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
2
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
3
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
4
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
5
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
6
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
7
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
8
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
9
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
10
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
11
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
12
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
13
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
14
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
15
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
16
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
17
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
18
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
19
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
20
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा

‘आधार’चा संथ कारभार; पुणे-पिंपरीसह जिल्ह्यातील नागरिकांची होतेय ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 4:41 PM

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तुरळक ठिकाणीच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु आहेत. 

ठळक मुद्देशहरात आणि जिल्ह्यात उपलब्ध नाहीत पुरेशी आधार केंद्र नोंदणी अथवा अद्ययावतीकरणासाठी नागरिकांना थांबावे लागते पाच ते सहा ताससॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू असल्याचे कारण देत महाआॅनलाईनचे काम संथ

पुणे : प्राप्तिकर कर भरायचाय?... बँकेचे व्यवहार करायचेत?... रेशन हवे आहे?... शाळेत प्रवेश हवा आहे?... आॅनलाईन सातबारा हवाय?... मालमत्ता पत्रक हवेय?... कर्जमाफी हवीय?... मग द्या आधार कार्ड. राज्य आणि केंद्र शासनाने आधार कार्ड लिंक करण्याच्या सक्तीचा एकीकडे सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे शहरात आणि जिल्ह्यात पुरेशी आधार केंद्रच उपलब्ध नाहीत. बोकाळलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांची ससेहोलपट याकडे जिल्हा प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. ढिलावलेल्या जिल्हा प्रशासनाचे अतिवरीष्ठ अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून बसले असून राज्य शासनाकडे बोट दाखवून स्वत:ची जबाबदारी झटकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तुरळक ठिकाणीच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु आहेत. टपाल खाते आणि बँकांना आधार केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सध्या टपाल खात्याकडून दोन ठिकाणी केंद्र सुरु असून विविध बँकांच्या २२ शाखांमध्ये आधार नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. या ठिकाणांवर दिवसभरात अवघे दहा ते बारा नागरिकांचीच नोंदणी अथवा अद्ययावतीकरणाची कामे होतात. नागरिकांना पाच ते सहा तास या कामासाठी थांबावे लागते. टोकन घेऊन नागरिकाचा नंबर लागेपर्यंत जवळपास तीन ते चार तासाचा कालावधी जातो. केंद्रावरील मशीनवर नागरिकांच्या हातांचे ठसेच उमटत नाहीत, तर अनेकदा डोळ्यांचा रेटीना व्यवस्थित येत नाही अशी कारणे देऊन नागरिकांना वाटेला लावले जाते. काही दिवसांनी पुन्हा नागरिकांना या आधार केंद्रांवर खेटे मारावे लागतात. याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे विचारणा केल्यावर नागरिकांना आधारची वेबसाईट बघा, त्यावर केंद्रांची यादी टाकण्यात आलेली आहे मोघम उत्तरे दिली जात आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी आधार नोंदणीचे नोंदणीचे काम चार कंपन्यांकडून काढून घेण्यात आले होते. त्यानंतर हे काम महाआॅनलाईनला देण्यात आले आहे. महाआॅनलाईनकडूनही कामाच्या बाबतीत चालढकल करण्यात येत असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. आधार नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम सुरू असल्याचे कारण देत आधार नोंदणीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.ऐन दिवाळीच्या काळात आधार कार्ड न दिलेल्या रेशन ग्राहकांना रेशन न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यात केवळ ३९ टक्केच आधार जोडणी झालेली असल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवीत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला होता. जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी महापालिका क्षेत्रात आधार केंद्रांची संख्या, मशीन्स यांची संख्या कमी आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधार केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी काम केलेल्या खासगी कंपन्यांना शासकीय कार्यालयांमध्ये येऊन आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव युनिक आयडेंटीफिकेशन अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाला (युआयडी) जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आला होता. पुरेशा आधार केंद्रांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रिय कार्यालयांसह जिल्ह्यातील मंडल स्तरावर आधार केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डonlineऑनलाइन