सहकारनगर : सहकारनगर- पद्मावती परिसरात अल्पदरात दवाखाना सुरू करण्याचा मानस आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून, त्यांना रोजगार मिळवून देणार असल्याचे सहकारनगर पद्मावती प्रभाग क्रमांक ३५ चे उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रुपेश तुरे यांनी सांगितले. प्रभागातील ब गटातून लढत असलेले रुपेश तुरे यांनी पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधला संभाजीनगर, चव्हाणनगर, शंकरमहाराज वसाहत, तीनहत्ती चौक, काळुबाईमाता मंदिर, पद्मावती भागात नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्वच्छ चारित्र्य व सुशिक्षित म्हणून ओळख असणारे उमेदवार म्हणून तुरे यांना नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. पदयात्रेत मंगेश पोखरकर, ऋतुराज चितळे, आशिष नाईक, अनुज नाईक, हृषीकेश नांगरे पाटील, राजू मोरे, प्रशांत तुरे, मनोज कुदळे, शुभम मोहिते, मामा नगरकर, आनंद पांढरे, बापू बनसोडे उपस्थित होते. रुपेश तुरे म्हणाले, की तरुणांना व्यसनमुक्त करणे गरजेचे आहे. प्रभागातील अनेक प्रश्नांवर उपाययोजनांची संकल्पना आहे. भविष्यात प्रसूतिगृह उभारणार आहे. (वार्ताहर)
अल्पदरात दवाखाना सुरू करणार
By admin | Published: February 16, 2017 3:24 AM