लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध पौर्णिमेनिमित्त बावधन येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या वेळी शाळकरी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बोधी संघातर्फे आधार कार्डचे स्मार्ट कार्ड करून देण्यात आले. याचा लाभ गावातील ६०० नागरिकांनी घेतला. तसेच, १०० नागरिकांनी पॅनकार्डसाठी अर्ज भरला.यावेळी बोधी संघाचे संस्थापक मयूर कांबळे, नगरसेवक किरण दगडे, अल्पना वर्पे, अंजली कांबळे, विजय केदारी, गोरख दगडे, कुणाल वेडे, अमित डोळस, गणेश दगडे,अजित दुधाळे, प्रवीण वैरागर, वैभव मुरकुटे, अमर कोकाटे, आत्माराम ववले, संजय दगडे, रोहिदास दगड उपस्थित होते.
बावधनमध्ये स्मार्ट आधार कार्डचे वाटप
By admin | Published: May 12, 2017 4:42 AM