पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्घाटन करण्यासाठी काही प्रकल्पांचे एका दिवसात वर्कआॅर्डर काढून काम देण्यात आणि प्रत्यक्षात ते काम एका महिन्यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते, अशी टीका नगरसेवकांनी मुख्यसभेत केली. त्याबाबत माहिती घेऊन त्याचा ७ दिवसांत अहवाल देतो, असे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या पुनर्वसनासाठी कोणतीही मान्यता घेतली नसताना त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, अशी जोरदार टीका नगरसेवकांनी केली. मुख्यसभेच्या कामकाजास सुरुवात होताच संजय बालगुडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांचा विषय उपस्थित केला. स्मार्ट सिटी प्रकल्प हा वर्णव्यवस्थेप्रमाणे राबविण्यात येत आहे. गुजरात हुकूमशाही इथे राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्मार्ट सिटीबाबत बोलताना काँग्रेस पक्षावर मोघम आरोप केले जाऊ नयेत, असे अरविंद शिंदे यांनी सांगितले. स्मार्ट सिटी प्रकल्प पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे मत सभागृहनेते बंडू केमसे यांनी व्यक्त केले. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी घेण्यात आलेले निर्णय हे माझे एकट्याचे नसून संपूर्ण संचालक मंडळाचे ते निर्णय असतात. या प्रकल्पांसाठी आवश्यक ते सर्व परवाने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल ७ दिवसांत सादर केला जाईल.- कुणाल कुमार महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून लाइट हाऊसचा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात तो स्मार्ट सिटीमधील प्रकल्प असल्याचे दाखवून त्याचे उद्घाटन करण्यात आले.- सिद्धार्थ धेंडे आयुक्तांना स्मार्ट सिटीसाठी जेव्हा पालिकेची मदत लागते, तेव्हा ते सांगतात हा संयुक्त प्रकल्प आहे. इतर वेळी मात्र स्मार्ट सिटीतील ते स्वतंत्र प्रकल्प असल्याचे सांगतात.- किशोर शिंदे
‘स्मार्ट सिटी’चा अहवाल लवकरच
By admin | Published: July 26, 2016 5:29 AM