शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

स्मार्ट सिटी ‘एसपीव्ही’ला मंजुरी

By admin | Published: February 26, 2016 4:26 AM

स्मार्ट सिटीमधील कामांसाठी स्थापन करायच्या एसपीव्हीला (स्वतंत्र कंपनी) महापालिकेत आज बहुमताने मंजुरी मिळाली. तत्पूर्वी, कंपनीचे विरोधक असलेल्या काँग्रेस, मनसेने त्यातील तरतुदींचे

पुणे : स्मार्ट सिटीमधील कामांसाठी स्थापन करायच्या एसपीव्हीला (स्वतंत्र कंपनी) महापालिकेत आज बहुमताने मंजुरी मिळाली. तत्पूर्वी, कंपनीचे विरोधक असलेल्या काँग्रेस, मनसेने त्यातील तरतुदींचे वाभाडे काढले. केंद्र व राज्य सरकारचा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कंपनीकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला; तर मनसेने हा पुणे शहर गहाण टाकण्याचा प्रकार असल्याची टीका केली.कंपनीला पाठिंबा असलेल्या पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी व सत्तेत नसूनही त्यांना पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या एकाही सदस्याने पाठिंब्याचे भाषण केले नाही. शिवसेनेने यापूर्वी कंपनीला विरोध केला होता; मात्र आज झालेल्या खास सभेत पाठिंबा दिला. काँग्रेस व मनसेच्या सदस्यांची उपसूचना फेटाळली गेली तर सेना, भाजप, राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या उपसूचना प्रस्तावाचा भाग करण्यात आल्या. कंपनी स्थापनेच्या बाजूने राष्ट्रवादी-भाजप-सेनेचे ८५ मतदान झाले. काँग्रेस व मनसेची ४८ मते विरोधात पडली. बहुमताने प्रस्ताव मंजूर झाला; मात्र त्यासाठी राष्ट्रवादी व भाजप तसेच आयुक्त कुणाल कुमार यांनाही टीकेचे घाव सोसावे लागले.हा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी आयुक्त आग्रही होते. विरोध सौम्य व्हावा, यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्यासही कमी केले नाही. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीत सर्व काही प्रशासनाच्या बाजूने असल्याची टीका होत होती. मात्र, केंद्र सरकारची योजना आहे म्हणून सुरुवातीला भाजपचा, नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा त्यांना मिळाला व आता सेनाही कंपनी स्थापन करण्याच्या बाजूने होऊन प्रस्ताव मंजूर झाला. १५ मार्चच्या आत प्रस्ताव मजूर झाल्यामुळे प्रशासनाला आता कंपनी कायद्याखाली या कंपनीची नोंद करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.