पुणे : केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यासाठी पुणे शहराची निवड केल्यानंतर महापालिकेने तयार केलेल्या स्मार्ट सिटीच्या प्रस्तावित आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना केली जाणार आहे. या कंपनीमार्फत केंद्र शासन, राज्य शासन व महापालिकेकडून मिळालेला निधी तसेच इतर मार्गांनी पैसा उभारून विकास कामे मार्गी लावली जाणार आहेत.स्मार्ट सिटीच्या कंपनीमध्ये राज्य सरकार व महापालिका यांचे ५० : ५० टक्के शेअर्स असणार आहेत. विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी/महापालिका आयुक्त यापैकी एकाची कंपनीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल. या कंपनीच्या संचालक मंडळामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, महापालिका यांचे प्रतिनिधी असणार आहेत. स्मार्ट सिटी आराखडा प्रकल्पाचे काम गतीने व्हावे, याकरिता या कंपनीला पूर्ण स्वायत्तता देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीतील प्रकल्पांना स्वीकृती, मंजुरी देणे, त्याची अंमलबजावणी करणे, प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, आवश्यक ते करार करणे, प्रकल्पांच्या गणुवत्तेचा आढावा घेणे आदी कामे या कंपनीला पार पाडावी लागणार आहेत.
स्वतंत्र कंपनीमार्फत होणार स्मार्ट आराखड्याची अंमलबजावणी
By admin | Published: December 03, 2015 3:35 AM