शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

धावत्या बसच्या पुढील बाजूने धुराचे लोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 2:48 AM

यापूर्वीही पीएमपीच्या मालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या बस काही वर्ष जुन्या आहेत. शनिवारी इंजिनमधून धूर आलेली बस

पुणे : धावत्या बसच्या पुढील बाजूने अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने शनिवारी दुपारी लक्ष्मी रस्त्यावर एकच धावपळ उडाली. चालकाने तत्काळ ही बस थांबवून प्रवाशांना बाहेर काढले. दरम्यान, मार्च महिन्यातच ताफ्यात आलेल्या नवीन मिडी बसमधूनच धूर आल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) देखभाल-दुरुस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पीएमपीच्या ताफ्यात मार्च महिन्यापासून दोन महिन्यांत सुमारे २०० नवीन मिडीबस दाखल झाल्या आहेत. यापैकीच एक बस शनिवारी दुपारी शनिपार ते निलज्योती या मार्गावर धावत असताना लक्ष्मी रस्त्यावर दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या वेळी बसच्या पुढील बाजूने इंजिनातून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. चालक व प्रवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ते तातडीने बसमधून उतरले. धुराचे लोट वाढत गेल्याने प्रवाशांसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळात गाडी दाखल झाली. पाण्याची फवारणी करून धुरावर नियंत्रण मिळविण्यात आले. पीएमपी अधिकाऱ्यांनी बसची पाहणी केली. इंजिनातील तांत्रिक बिघाडामुळे ते गरम झाले. त्यामुळे धूर आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.जुन्या बसयापूर्वीही पीएमपीच्या मालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या बस काही वर्ष जुन्या आहेत. शनिवारी इंजिनमधून धूर आलेली बस सहा महिन्यांपूर्वीच ताफ्यात दाखल झाली आहे. या मिडीबसेसच्या देखभाल-दुरुस्तीबाबतही अनेक तक्रारी आल्या आहेत. या बसचेही अनेकदा ब्रेकडाऊन झाले आहे. डिजिटल फलक, दरवाजे यांसह अन्य तांत्रिक यंत्रणाही काम करत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यातच आता इंजिनातून मोठ्या प्रमाणावर धूर येण्याची घटना शनिवारी घडली. नवीन बसबाबतही अशा घटना घडू लागल्याने प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. या घटनेने पीएमपीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामावर प्रवाशांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टॅग्स :Puneपुणे