आळंदी : मरकळ व धानोरे येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्याच्या धुराड्यातून सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे गावातील नागरिकांचेआरोग्य धोक्यात आले आहे. यास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते व खेड दक्षता समितीचे सदस्य बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले.
मरकळ, धानोरेमधील नागरिकांना या धुराच्या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने याबाबतची तक्रार महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे विभागीय कार्यालयात करण्यात आली असल्याचे चौधरी यांनी सांगितले. नागरिक व कामगारांचे आरोग्य या धुराचे त्रासाने धोक्यात आले आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मंडळाने कारखानदारांना पाठीशी न घालता संबंधित कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांची स्थापना नागरीक, पशु, पक्षी, हवा, पाणी यांचे जीव रक्षणास झाली आहे.तत्काळ उपाययोजनावाढते प्रदूषण रोखण्यास तत्काळ उपाययोजना करण्यास मंडळ दुर्लक्ष करीत आहे. प्लॅस्टिकबंदी, फटाक्यांच्या आवाजावर बंदी केली जात आहे. मात्र, वायू प्रदूषण करणाºया कारखान्यांवर कारवाईत प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.प्रत्येक सजीवाला निरोगी आरोग्य जगण्याचा अधिकार आहे. यासाठी प्रभावी कामकाज करण्याची मंडळाची जबाबदारी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.