पुणे : रमजानचा पवित्र महिना येत्या २४ मार्चपासून सुरू होत आहे. पुढील महिनाभर शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. हा महिना मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना असतो. मुस्लीम बांधव हा महिना मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो.
महापालिकेने या संपूर्ण महिन्यात पाणीपुरवठ्यामध्ये कोणताही खंड पडू न देता पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा. असे पत्र राज्य शासनाकडून पुणे महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने संपूर्ण महिना पाणीपुरवठा सुरळित राखण्यासाठी, पाणीपुरवठा केंद्रांचा विद्युत प्रवाह खंडित करू नये असे पत्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिले आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिली.