नितीन चौधरी
पुणे : स्वातंत्र्यानंतर १९५१ पासून २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत पुणे जिल्ह्यातून तब्बल २६६ आमदार वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हांवर निवडून आले. मात्र, यात तब्बल १५ आमदार हे अपक्ष होते. राष्ट्रीय तसेच राज्य पक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीचा फटका विशेषत: कॉंग्रेसला ९ वेळा बसला आहे. या अपक्षांमध्ये १९९९ मध्ये इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे तब्बल २६ हजार ९४२ मतांचे तर १९७२ मध्ये आंबेगावमधून किसनराव बाणखेले यांना २६ हजार ८४३ मताधिक्य मिळाले होते. तर १९७८ मध्ये भोर मतदारसंघातून संपतराव जेधे केवळ ४९८ मतांनी विजयी झाले होते. याच निवडणुकांदरम्यान २७ अपक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. शहरातील बोपोडी व भवानी पेठ मतदारसंघाने अपक्षांना प्रत्येकी एक वेळा संधी दिली आहे.
पाच पंचवार्षिकचा अपवाद
तिकीट न मिळाल्याच्या कारणावरून अनेक उमेदवार बंडखोरी करतात. ऐनवेळी उमेदवाराचा अर्ज बाद होणे, अधिकृत उमेदवाराने माघार घेणे तसेच उमेदवार बदलण्याच्या प्रक्रियेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे प्रकार राजकीय पक्षांकडून घडत असतात. त्यामुळे अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. पुणे जिल्ह्यात १९५१ पासून २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत २६६ आमदार निवडून गेले आहेत. त्यात तब्बल १५ अपक्ष उमेदवारांना आमदार होण्याची संधी मिळाली आहे. अपक्षांना निवडून देण्याची परंपरा ही १९५१ पासूनच आहे. मात्र, त्याला १९६२, १९६७, १९८०, २००४ व २०१९ चा अपवाद आहे. अर्थात या वर्षाच्या सार्वत्रिक निवडणुकांत अपक्ष निवडून आले नव्हते.
हर्षवर्धन पाटील दोनदा अपक्ष
या १५ अपक्षांमध्ये १९९९ मध्ये इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील हे २६ हजार ९४२ इतक्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले होते. त्याखालोखाल १९७२ मध्ये आंबेगावमधून किसनराव बाणखेले यांना २६ हजार ८४३ मताधिक्य मिळाले होते. तर १९७८ मध्ये भोर मतदारसंघातून संपतराव जेधे केवळ ४९८ मतांनी विजयी झाले होते. या अपक्षांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा अपवाद वगळता कोणताही अपक्ष दोनदा निवडून आलेला नाही. हर्षवर्धन पाटील हे १९९५ व १९९९ मध्ये दोनदा अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले आहेत.
भोरमधून तीन वेळा अपक्ष आमदार
जिल्ह्यात १९५१ मध्ये १, १९५७ मध्ये २, १९७२ मध्ये २, १९७८ मध्ये २, १९७८ मध्ये १, १९८५ मध्ये १, १९९० मध्ये १, १९९५ मध्ये १, १९९९ मध्ये १, २००९ मध्ये ३ व २०१४ मध्ये १ अपक्ष आमदार झाला आहे. तर भोरमधून तीन वेळा, आंबेगाव, भोसरी, इंदापूर व दौंडमधून प्रत्येकी दोन वेळा तर मावळ उत्तर मुळशी, चिंचवड, बोपोडी, भवानी पेठमधून एकदा अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.----------
दुसऱ्या क्रमांकावरील अपक्ष
याच काळात अन्य मतदारसंघांमधून २७ अपक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने निवडून येण्यात अपयशी ठरले आहेत. त्यात १९५७ मध्ये १, १९६२ मध्ये ४, १९६७ मध्ये १, १९७२ मध्ये ३, १९७८ मध्ये १, १९९० मध्ये ५, १९९५ मध्ये ४, १९९९ मध्ये १, २००४ मध्ये २, २००९ मध्ये ३ व २०१९ मध्ये २ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.
वर्ष मतदारसंघ उमेदवाराचे नाव मते मतांचा फरक
१९५१ मावळ उत्तर मुळशी वीरधवल दाभाडे १५४०७ ८११९१९५१ मावळ उत्तर मुळशी गजानन गुपे (कॉंग्रेस) ७२८८
--------१९५७ आंबेगाव बाबूराव घोलप १२६१४ ३५८६१९५७ आंबेगाव अण्णासाहेब आवटे (कॉंग्रेस) ९०८२----------
१९५७ भोर जयसिंग माळी १८७७३ ८६०५१९५७ भोर नामदेव मोहोळ (कॉंग्रेस) १०१६८
----------१९७२ आंबेगाव किसनरान बाणखेले ३८९०८ २६८४३१९७२ आंबेगाव दत्तात्रय पाटील (कॉंग्रेस) १२०६५-------
१९७२ भोर अनंतराव थोपटे २७४०१ ११९७६१९७२ भोर उषा चौधरी (कॉंग्रेस) १५४२५
-------१९८७ बोपोडी एल. टी. सावंत २१७५० ३२७७१९८७ बोपोडी शशिकांत कदम (कॉंग्रेस आय) १८४७३------------
१९७८ भोर संपतराव जेधे २७२२५ ४९८१९७८ भोर अनंतराव थोपटे (कॉंग्रेस) २६७२७
----------१९८५ भवानी पेठ प्रकाश ढेरे ३४७४५ ९८४६१९८५ भवानी पेठ भाई वैद्य (जनता पक्ष) २४८९९---------------
१९९० दौंड सुभाषराव कुल ५९९८२ ९७८८१९९० दौंड उषादेवी जगदाळे(काँग्रेस) ५०१९४
----------१९९५ इंदापूर हर्षवर्धन पाटील ५९१२५ १११७६१९९५ इंदापूर गणपतराव पाटील (कॉंग्रेस) ४७९४९--------
१९९९ इंदापूर हर्षवर्धन पाटील ६४८४० २६९४२१९९५ इंदापूर मुरलीधर निंबाळकर (राष्ट्रवादी) ३७८९८
----------२००९ दौंड रमेश थोरात ८५७६४ १७४४२२००९ दौंड राहुल कुल (राष्ट्रवादी) ६८३२२----------
२००९ चिंचवड लक्ष्मण जगताप ७८७४१ ६५७५२००९ चिंचवड श्रीरंग बारणे (शिवसेना) ७२१६६
-----------२००९ भोसरी विलास लांडे ५०४७२ १२७२२००९ भोसरी सुलभा उबाळे (शिवसेना) ४९२००---------
२०१४ भोसरी महेश लांडगे ६०१७३ १५३१६२०१४ भोसरी सुलभा उबाळे (शिवसेना) ४४८५७