शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

...तर धनगर समाजाची एकत्रित ताकद दाखवून देऊ; आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:10 AM

समाज एकत्रित करुन रस्त्यावरची लढाई लढणे राज्य सरकारला ताकद दाखवून देणे हा प्लॅन बी

इंदापूर: डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत धनगर आरक्षण अंमलबजावणी संदर्भात उच्च न्यायालयाकडून अपेक्षित निर्णय होण्याची शक्यता आहे. तसे झाले नाही तर समाजाची एकत्रित ताकद दाखवून राज्यशासनाकडे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात येईल, असा संकेत आ. गोपीचंद पडळकर यांनी आज (दि.१६) नगरपरिषदेच्या प्रांगणात झालेल्या धनगर समाज बांधवाच्या मेळाव्यात दिला. धनगर जागर यात्रेनिमित्त हा मेळावा घेण्यात आला होता.

 ते पुढे म्हणाले की,धनगर आरक्षणाचा खटला  न्यायालयात लढवणे हा आपला प्लॅन ए आहे. समाज एकत्रित करुन रस्त्यावरची लढाई लढणे राज्य सरकारला ताकद दाखवून देणे हा प्लॅन बी आहे. त्यासाठी आपण धनगर जागर यात्रेचे आयोजन केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. आरक्षणासंदर्भात जे अपेक्षित होते ते राज्यसरकारने तीन शपथपत्रांमध्ये सादर केले आहे. आरक्षणाबाबत राज्यसरकारने न्यायालयात ठाम बाजू मांडली आहे. आठ, अकरा व पंधरा डिसेंबर या दिवशी आरक्षणाच्या प्रकरणासाठी अंतीम सुनावणी ठेवली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गेल्या सत्तर वर्षाच्या अन्यायास वाचा फुटेल. धनगराच्या पोराच्या अनुसूचित जमातीचा दाखला मिळेल,याची खात्री आहे, मात्र काही उलटसुलट झाल्यास एकत्रित येवून राज्यशासनाला समाजाची ताकद दाखवून देवू. राज्यशासनाने दाखला देण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी करु,असे ते म्हणाले.

 जागर यात्रा सुरु केली. त्यावेळी लांडग्याची सारी पिल्ले जागी झाली आहेत. एकीकडे आरक्षणाची केस न्यायालयात प्रलंबित आहे दुसरीकडे जागर यात्रा काढतोय असे बोलले जात आहे. पुण्याचा परिसरातील धनगराच्या व जेजुरीमधील होळकरांच्या जमिनी, रामोशी समाजाच्या वतनाच्या, महार वतनाच्या जमिनी कागदोपत्री फेरफार करुन प्रस्थापितांच्या बगलबच्च्यांनी लाटल्या. या जमिनी परत काढून घ्याव्या आहेत. त्यासाठी ताकदीने उभे रहावे लागेल,असे ते म्हणाले.

प्रत्येक बहुजन आपला भाऊ    धनगर समाजाच्या भल्यासाठी सगळ्या पोटजाती विसरुन एकत्र आले पाहिजे. जेवढे गट पडतील तेवढे ते प्रस्थापितांसाठी चांगले आहे. त्यामुळे शाखाभेद करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे घातक आहे. आत्ता ज्यावेळी जनगणना येईल त्यावेळी पोटजातीचा कोठे ही उल्लेख करु नका,असे आवाहन त्यांनी केले. आपले आराध्य दैवत खंडोबा बिरोबा आहे. खंडोबाचा भंडारा लावलेला प्रत्येक बहुजन आपला भाऊ आहे हे समजून सर्वांची एकजूट करायची आहे हे लक्षात ठेवा,असे ही त्यांनी सांगितले.    'एसटीडी' मध्ये किती दिवस गुरफटणार

एस म्हणजे साहेब,टी म्हणजे ताई व डी म्हणजे दादा अशी फोड करुन या 'एसटीडी' मध्ये किती दिवस गुरफटणार आहात, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. 'त्या' गुलामगिरीतून बाहेर पडा. एकदिवस तुम्ही राजा व्हाल. गुलामगिरीत ठेवण्यासाठीच साहेब ताईसाहेब दादासाहेब असे चालले आहे. आपला साहेब एकच डॉ. बाबासाहेब. दुसरे कोणी नाही. त्यांच्यामुळेच आपण माणसात आहोत, असे आ. पडळकर म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरGopichand Padalkarगोपीचंद पडळकरMLAआमदारDhangar Reservationधनगर आरक्षण