शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

...म्हणून मोदी सरकारनं कोरोना लसींच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांच्या अंतराचा फतवा काढला..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 8:44 PM

कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यायला हवा; मी स्वत: घेतला, सायरस पूनावाला यांचं मोठं विधान

पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या दोन डोसमधील अंतर दोन महिने असले पाहिजे. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे मोदी सरकारने तीन महिन्यांच्या अंतराचा फतवा काढला आहे अशा शब्दात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोरोना होऊन गेलेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी. ज्यांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही, त्यांना प्राधान्य मिळाले पाहिजे असेही पुनावाला म्हणाले.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर डॉ. सायरस पुनावाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुनावाला म्हणाले,कोव्हिशिल्ड लस घेतल्यावर निर्माण झालेल्या अँटीबॉडी सहा महिन्यांनी कमी होऊ लागतात. म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे. 

सिरम इन्स्टिट्यूटतर्फे इतर सर्व लसींचे मिळून १५ कोटींचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे, केवळ कोव्हिशिल्डच्या १५ कोटी लसींचे उत्पादन एका महिन्यात केले जात आहे. नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी, यासाठी आम्ही कोरोनावरील लसीला प्राधान्य देत आहोत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अदर पुनावाला केवळ उन्हाळी सुट्टयांसाठी परदेशी गेले होते. धमक्या आल्यामुळे देश सोडावा लागला, असा विपर्यास करण्यात आला असेही पुनावाला यांनी नमूद केले.

कोव्हिशिल्ड लस घेतल्यावर निर्माण झालेल्या अँटीबॉडी सहा महिन्यांनी कमी होऊ लागतात. म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचा-यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे असेही महत्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे.

तिस-या लाटेची तीव्रता कमीहर्ड इम्युुनिटी आणि लसीकरणाच्या माध्यमातूनच साथीवर नियंत्रण मिळवता येईल. कोरोनाची साथ जोपर्यंत जाणार नाही, तोवर लस घ्यावी लागणार आहे. तिसरी लाट तितकीशी  तीव्र नसेल, कारण अनेकांना कोरोना होऊन गेला आणि  अनेकांचे लसीकरणही झाले आहे. पुण्यात लसींचा तुटवडा आहे, त्यामुळे पुण्याला जास्त लस द्या, असे आम्ही मोदी सरकारला सांगितले. मात्र सरकार याबद्दल उत्तर द्यायला तयार नाही. आम्हाला वाटेल ते आम्ही करु, असे त्यांनी सांगितले आहे.

कॉकटेल डोस परिणामकारक नाहीकॉकटेल लसीला माझा विरोध आहे. दोन वेगवेगळया लसींचे डोस दिले आणि परिणामकारकता चांगली नसल्यास लस उत्पादक कंपन्या एकमेकांवर आरोप करतील. हजारो लोकांच्या चाचण्यांमध्ये कॉकटेलची उपयुक्तता सिध्द झालेली नाही. कॉकटेल लसीला पूर्णपणे मान्यता मिळेल, असे वाटत नाही. कारण, तो खूप जोखमीचा आणि गुंतागुंतीचा निर्णय नसेल.

लॉकडाऊनची गरज नाही... लॉकडाऊनची गरज आहे, असे मला वाटत नाही. हर्ड इम्यनिटीमुळे लोकांना संरक्षण मिळू शकेल. कोरोनाचा मृत्यूदरही कमी आहे. जे रुग्ण वेळेत रुग्णालयात गेले नाहीत, दुखणे अंगावर काढले, ज्यांना उपचार मिळाले नाहीत, अशा रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला. वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरांकडून उपचार घेऊन अनेक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या