...म्हणून आता उपमुख्यमंत्री ‘अजितदादां’नी तिसरा डोळा उघडण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:06 PM2021-06-02T18:06:33+5:302021-06-02T18:06:57+5:30

खासदार सुप्रिया सुळे व विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द मानणारे गाव अशी माळेगावची ओळख आहे.

... So now Deputy Chief Minister Ajit Pawar needs to control on situation | ...म्हणून आता उपमुख्यमंत्री ‘अजितदादां’नी तिसरा डोळा उघडण्याची गरज

...म्हणून आता उपमुख्यमंत्री ‘अजितदादां’नी तिसरा डोळा उघडण्याची गरज

Next

माळेगाव: ऐतिहासिक वारसा संपन्न व सुसंस्कृत असलेल्या माळेगावाला राजकीय गुन्हेगारीने बदनाम केले आहे. गटातटातील वर्चस्वातुन गेल्या तीन साडेतीन वर्षात गाव अशांत झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागात तिसरा डोळा उघडण्याची गरज आहे.त्यानंतरच राजकीय गुन्हेगारी संपुष्टात येणे शक्य आहे. 

राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.खरे तर राजकीय दृष्टिकोनातून माळेगाव हे सातत्याने राजकीय पटलावर चर्चेत असणारे हे गाव आहे.खासदार शरद पवार यांची यशस्वी राजकीय कारकीर्द याच गावातील धुरंधरांनी घडवली आहे.पवार यांचे निवासस्थान याच गावात आहे.तसेच खासदार सुप्रिया सुळे व विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द मानणारे गाव अशी ओळख आहे.

पूर्वी गावात राजकीय गटतट होते.त्यांच्यात वादविवाद होत होता.अपवादाने मारामारी देखील झाली.पण शस्राचा वापर कधीच झाला नाही. त्यांचे वाद शब्दावर मिटायचे व गावात शांतता नांदायची. मात्र सन २०१७ ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासुन गटातटातील वादाला अधिक जोर आला.दोन गट एकमेकांना पाण्यात पाहु लागले.त्यामुळे गटाचे राजकारणात अधिक व्यापक होऊ लागले. वादविवाद वाढत गेले.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीस वर्ष होताच सोशल मीडियाचा वादासाठी वापर होऊ लागला.एक गट सोशल मिडीयावर जाहिरातबाजी करण्यात मग्न होता.तर दुसरा गट त्या विरोधी संदेश प्रसारित करत होता.एखाद्या राजकीय कार्यक्रमात अथवा ग्रामसभेत खडाजंगी होऊ लागली.  गेल्या तीन- चार महिन्यांत गावातील विकासकामे उद्घाटन,कोविड सेंटर,वाढदिवसाचे आक्षेपार्ह फ्लेक्स यावरून मोठा वादंग झाला होता.एका गटाची भांडणे झाली तर दुसरा गट ते भांडण कसे वाढेल याकडे लक्ष देत होता.यामधुन वैयक्तिक खुन्नस वाढत गेली.यातुन काही समर्थकांना मार खावा लागला होता.हा वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात गेला होता.
......
...वाद आणखी उफाळणार
आगामी काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे.या काळात गटातटातील वाद आणखी उफाळून येणार आहे.नगरपंचायत निवडणुकीसाठी चांगल्या व निष्कलंक उमेदवारांची गरज आहे.गावातील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी गावामध्ये वर्चस्व राखण्यासाठी गावगुंडाना हाताशी ठेवलेले पाहायला मिळतेय.
———————————————

Web Title: ... So now Deputy Chief Minister Ajit Pawar needs to control on situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.