बारामती : सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे आज माणूस अन्नाला देखील महाग झाला आहे .तो दंड कूठून भरणार ? माय बाप सरकार इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे .कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही ,किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची चिंता आहे. तरी दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी. दोन वर्षात दंडाच्या पावत्यामधून जमा केलेल्या रकमेमधून ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी सूरू करावी,अशा शब्दात भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
याबाबत गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. कोरोना तपासणी व दंडात्मक कारवाई बद्दल राज्यात सुरू असलेला कोरोना महामारीचा संसर्ग यामुळे सामान्य जणता घाबरली आहे. व्यापारी, तथा लघू उद्योजक, तसेच घरातील रूग्णांनमुळे बाहेर पडणारा सामान्य नागरिक हा गेले वर्षभर कमी जास्त प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाउन मुळे पुर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे.
आता संसर्ग वाढत असून रूग्णसंख्या वाढली आहे.या काळात व्यापारी, शेतमाल विक्रेते यांची कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.निर्णय चांगला आहे परंतू लाखो लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एक तपासणी केंद्र आहे .त्यामुळे तेथे तपासणी करता लोक जमल्यास गर्दी होत असून तपासणी साठी आलेल्या बरयाच लोकांना वारंवार तपासणी न करता परत जावे लागत आहे. यामुळे लोक तपासणी ला टाळाटाळ करत आहेत. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक, तसेच महत्वाच्या कामासाठी इच्छा नसतानाही घराबाहेर पडलेलले लोक हे बॅकेचे हप्ते,जागाभाडे, लाईट बिल, दवाखान्याचा खर्च यामुळे मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे त्याची आवक बंद झाली आहे .तरी देखील आपल्या आदेशाने यांच्या वर सर्रास दंडात्मक कारवाई केली जात आहे.आरोग्य केंद्र नसेल त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. काही कारणास्तव विना मास्क बाहेर पडणाऱ्यांना रस्त्यावर मोफत मास्क देण्याची सोय करावी.या पत्राद्वारे आम्ही आपणास महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सध्याच्या परिस्थितीत निर्माण होत असल्याने अडचणींनवर तातडीने मार्ग काढण्यासाठी विनंती करीत आहे. दम्याचा त्रास असणारा मास्क मध्ये गुदमरतोय .तरी तो घरा बाहेर का पडतोय ? हे सगळं आपूलकीने जाणून घेण्याची गरज आहे .त्याची कारणे नक्कीच डोळे पाणावणारी आहे.मुख्यमंत्रीसाहेब या पत्राचा राजकारण म्हणून विचार न होता सहानभूतीने विचार करावा,अशी मागणी वाकसे यांनी केली आहे.————————————————