...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 04:23 PM2024-07-17T16:23:40+5:302024-07-17T16:25:09+5:30

ती बारामती आहे, तिकडं लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत

So Supriya Sule got elected in Baramati Sharad Pawar told the math behind winning Baramati | ...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित

...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित

पुणे : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना (Sharad Pawar) बारामती लोकसभेबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी बारामतीत विकास केला, तरी लोकांनी तुम्हाला का निवडलं? यावर उत्तर देताना पवारांनी 'अरे ती बारामती आहे' असे बोलताच परिषदेत हशा पिकला. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची नणंद- भावजयमध्ये लढत पाहायला मिळाली. देशात या लढतीची चर्चा झाली होती. राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर दोन गट पडले. एक गट शरद पवार आणि दुसरा अजित पवार यांचा गट होता. म्हणजेच बारामतीत एका प्रकारे काका पुतण्या यांची लक्षवेधी लढत होणार असल्याचे म्हंटल जात होत. देशाचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत बारामतीत सुप्रीया सुळेंनी विजय मिळवला. तब्बल लाखांच्या फरकाने सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या.  

पवार म्हणाले, बारामतीत लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत. आधी मी 50 टक्के लोकांना नावानं ओळखत होतो. पण ती जुनी लोकं आता नाहीत. पण मला खात्री होती की, लोक सुप्रियाला निवडून देतील. अजित पवारांना घरात स्थान, मात्र पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्तेच घेतील असाही शरद पवारांनी यावेळी सांगितलं. 

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीच काय 

महाराष्ट्रात अजित पवार आणि जयंत पाटील ६ ते ७ वेळा बजेट मांडायची संधी मिळाली. तेव्हा बहीण भाऊ कुठेही दिसले नाहीत. आता राज्याच्या बजेटमध्ये बहीण भावांचा विचार होतोय याचा मला आनंदच आहे. मात्र, हा सगळा चमत्कार लोकसभा निकालातील मतदारांच्या मतांचा आहे, मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण-भाऊ सर्वांची अडचण होते. मलाच एकच काळजी आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे. 

Web Title: So Supriya Sule got elected in Baramati Sharad Pawar told the math behind winning Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.