शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

...म्हणून मग रोहित पवारांनीच काढला 'तो' सेल्फी..! अन् 'मावशीं'च्या आनंदाला उरला नाही पारावार

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 10, 2020 1:08 PM

रोहित पवार हे सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असलेले देखील आपण पाहत असतो..

पुणे : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे अनेकदा या ना त्या कारणाने चर्चेत असतात. राजकीय जीवनासोबतच ते सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय असलेले देखील आपण पाहत असतो. त्यांचे विविध सामाजिक उपक्रमांची माहिती असो वा नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा नेत्यांवर सोडलेले टीकास्त्र ही त्यामागची काही कारणे आवर्जून सांगता येतील. पण यावेळी रोहित पवार हे पुण्यातील एका आगळ्यावेगळ्या प्रसंगामुळे कौतुकाचा विषय ठरले आहे. 

रोहित पवार हे आपल्या वैयक्तिक कारणास्तव पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये आले होते. काम पूर्ण झाल्यावर ते आपल्या गाडीत बसून पुन्हा एकदा प्रवासाला लागणार तेवढ्यात तेथे रुग्णालयात काम करणाऱ्या एका मावशींनी त्यांना आवाज दिला. कामाची धावपळ पाठीमागे असताना देखील त्यांनी त्या मावशींचा आवाज ऐकल्यावर आपली गाडी ताबडतोब थांबवली. त्यानंतर मावशी जवळ आल्यावर  त्यांची व कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली. परंतु, हे सर्व झाल्यावर मावशींनी पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याबाबत त्यांना विचारणा केली. यावर पवार यांनी तात्काळ होकार दिला. पण खरी अडचण येथून पुढे निर्माण झाली. कारण काही केल्या त्या मावशींना सेल्फी घेता येईना. त्यामुळे त्यांना काही वेळ सुचेनाच काय करावे ते. तेवढ्यात रोहित पवार यांनी स्वतः त्यांचा मोबाईल घेत सेल्फी फोटो काढला. त्यानंतर त्या मावशींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पवार यांना देखील सुखावणारा होता. 

राजकीय व्यक्ती म्हटलं की पाठीशी धावपळ ही ओघाने ठरलेलीच असते. त्याला रोहित पवार हे देखील अपवाद नाही. पण रुग्णालयातील भेटीनंतर एवढ्या गडबडीत सुद्धा त्यांनी त्या मावशींना वेळ देत सेल्फी घेतला. हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अर्थात नेहमी आपल्या कामा दरम्यान येणारे छोटे मोठे चांगले अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर पवार ठेवत असतात. उमेश मुळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याविषयीची पोस्ट लिहिताना रोहित पवार यांच्या सोबतचे त्या मावशींचे फोटो देखील शेअर केले आहे. रोहित पवार यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचा हा क्षण त्या मावशींच्या जीवनात एक अविस्मरणीय आठवण देऊन गेला. 

 

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसhospitalहॉस्पिटल