...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:44 AM2024-11-19T05:44:22+5:302024-11-19T05:45:16+5:30

बारामती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते.

...So who do the rulers run the kingdom for?; Sharad Pawar's question | ...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल

...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल

बारामती : सत्ताधाऱ्यांनी राज्यात महिला, मुलींसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली; पण त्या सुरक्षित नाहीत. आज तरुणांना शिक्षण घेऊन देखील रोजगार नाही. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली. महिला, युवक, शेतकऱ्यांची ही अवस्था असेल, तर मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

बारामती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सांगता सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, अत्याचारित मुली व महिलांची संख्या ६७ हजार ३८१ वर पोहोचली आहे. ६४ हजार मुली बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणती पावले टाकली, याचे उत्तर द्यावे. देशाचा विचार न करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची का, याचा विचार करा', असा सवाल शरद पवारांनी बारामतीत प्रचाराच्या सांगता सभेत केला.  

Web Title: ...So who do the rulers run the kingdom for?; Sharad Pawar's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.