शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

इंग्रजकालीन घड्याळाऐवजी मिळाले साबण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:15 PM

ऑनलाइन वस्तू मागविल्यावर त्या वस्तूऐवजी पार्सलमधून साबण मिळाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.

पुणे : ऑनलाइन वस्तू मागविल्यावर त्या वस्तूऐवजी पार्सलमधून साबण मिळाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. मात्र, इंग्रजकालीन घड्याळाऐवजी साबणाच्या वड्या मिळण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. इंग्रजकालीन घड्याळ देतो असे सांगून त्यांच्याकडून एकाने २ लाख रुपये घेतले. त्यांना एक पार्सल सोपविले. त्यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यात वर्तमानपत्राच्या कागदात कपड्याचे साबण असल्याचे आढळून आले.या प्रकरणी मुंबईतील ३८ वर्षांच्या तरुणाने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार कँटोंमेंट हॉस्पिटलच्या पाठीमागील गेटच्या समोरच्या गल्लीत शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईतील एक तरुण सारसबागेत आला असताना त्याची आरोपीशी ओळख झाली. त्याने आपल्याकडे इंग्रजकालीन घड्याळ असून ते हवे असेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आरोपीला २ लाख रुपये देण्याचे कबूल केले.आरोपीने त्यांना शनिवारी खडकी कँट्रोंमेंट हॉस्पिटल पाठीमागील गल्लीत बोलावले. त्यानुसार ते तेथे गेले त्याने त्यांच्याकडे एक पार्सल दिले. त्यांनी उघडून पाहिल्यावर त्यात वर्तमानपत्राचे कागद एकत्र करुन त्याचा गोलाकार रोल करुन त्यामध्ये कपड्यांचा साबन टाकून तो पेपरमध्ये गुंडाळून पिशवीत भरुन त्यांना दिला होता. पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली असून खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.