शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महिला अधिकाऱ्यांची समाजोपयोगी संवेदनशीलता

By admin | Published: October 15, 2015 1:11 AM

महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना

पुणे : महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना, एखादा गंभीर प्रसंग निर्माण झाल्यावर महिला अधिकारी कार्यालय अथवा फिल्डवर अधिक सक्षमपणे काम करतात. त्यामुळे महिलांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर कोणत्या पदावर आहे, याला महत्त्व राहत नाही, असे मत महिला शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांनी येथे व्यक्त केले.नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत बुधवारी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, जीवन प्राधिकरण, कोषागार विभागातील महिला अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील आव्हाने, पुरुष मानसिकतेत होत असलेला बदल, समाजात काम करताना येणाऱ्या अडचणी, अधिकारीपदावर असताना कार्यालय आणि घर या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी कसरत आणि या दोन्ही ठिकाणी स्वत:ला सुपरवुमन म्हणून सिद्ध करण्याची धडपड या विषयांवर सर्वच महिला अधिकाऱ्यांनी मनमोकळेपणे आपली मते मांडली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. अनेकदा क्षमता असूनही ‘की’ पोस्टवर डावलले जाणे, बदल्यांमुळे कुटुंबाची हेळसांड याचबरोबर खासगीच्या तुलनेत असलेले सुरक्षित वातावरण, वरिष्ठ अधिकारी व पुरुष कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेला पाठिंबा, समाजाचा बदलता दृष्टिकोन यामुळे शिक्षक व डॉक्टर या चौकटीच्या बाहेर पडून सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक मत महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.स्त्री-पुरुष समानतेपेक्षा समाजाच्या मानसिकतेत बदलाची गरज आहे. कार्यालयामध्ये एक कार्यक्षम व सक्षम अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे अन् दुसरीकडे गृहदक्ष स्त्रीची जबाबदारी देखील निभावताना अनेकदा महिला अधिकाऱ्यांची फरफट होते. एकाच वेळी विविध पातळ्यांवर ‘ती’ लढत असल्याने अनेक वेळा तिची मानसिक व शारीरिक घुसमट होते.- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विशाखा समित्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत झाली आहे. कार्यालयामध्ये पुरुष सहकाऱ्याकडून काही त्रास झाल्यावर तक्रार करण्यासाठी कोणताही फोरम नव्हता; पण विशाखा समित्यामुळे आता किमान तक्रार करण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या आहेत. समितीकडे तक्रार आल्यानंतर कारवाई होते हे कळल्यानेच महिलांची छेडछाड कमी झाली आहे.- उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी (मनपा)