शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

सोशल मीडियाचा अतिवापर घातक : डॉ. तात्यासाहेब लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 07:00 IST

माणसाचे आरोग्य चांगले असेल तर तो जीवनात काहीही करू शकतो. आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे; त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे अहे. हल्ली सोशल मीडियाचा प्र्रामुख्याने तरुणांकडून अति वापर केला जात आहे.

पुणे : माणसाचे आरोग्य चांगले असेल तर तो जीवनात काहीही करू शकतो. आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे; त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे अहे. हल्ली सोशल मीडियाचा प्र्रामुख्याने तरुणांकडून अति वापर केला जात आहे. सोशल मीडियाचा अति वापर आरोग्यासाठी प्रचंड घातक ठरत असून, अनेक आजारांचे ते बळी ठरत असल्याचे मत पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे व्यक्त केले.पी. एम. शहा फाउंडेशन आयोजित ७ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन लहाने यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी यू.एस.के. फाउंडेशनच्या उषा काकडे, पी. एम. शहा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण कोठडिया, डॉ. विलास राठोड, प्रकाश मगदूम, चेतन गांधी, डॉ. विक्रम काळूसकर उपस्थित होते.लहाने म्हणाले, ‘‘वयाच्या १२ वर्षापर्यंत डोळ््यांची वाढ होत असते; त्यामुळे या वयातील मुलांनी मोबाईलचा वापर कमी करावा. १ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना तर मोबाईल दाखवूसुद्धा नये. त्यांच्या नाजूक डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. अतिमोबाईल वापर हादेखील आरोग्यासाठी खूप घातक आहे. अलीकडे आहारात खूप मोठे बदल झालेले दिसतात.हॉटेलमधे जेवायच्या सवयी खूप वाढल्या आहेत; त्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवू लागले आहेत. देशातील लोक ज्या वेळी अशिक्षीत होते, त्या वेळी २२ टक्के लोक हृदयरोगाने मृत्युमुखी पडत होते; पण आता शिक्षित लोक असताना हृदयरोगाचे प्रमाण ४२ टक्क्यांवर गेले आहे. व्यसन हे तर आरोग्यासाठी सर्वांत घातक आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढवायला हवा. पालकांचा मुलांशी असणारा संवाद कमी होताना दिसतो आहे. योग्य आहार, व्यायाम, घरचे जेवण करा आणि आपले आरोग्य उत्तम राखा. पी.एम. फाउंडेशचे हे काम खूप कौतुकास्पद आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन करीत आहात, ही मोठी गोष्ट असे ते म्हणाले.उषा काकडे म्हणाल्या, आरोग्यावर चित्रपट महोत्सव होणे ही खूप मोठी आश्वासक बाब आहे. चित्रपटासारखे माध्यम सर्वांपर्यंत पोहचणे व त्यातून जनजागृती होणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपट पाहताना मनोरंजन म्हणून नव्हे तर त्यातून बोध घ्यावा.

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया