शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सोशलमीडियाने गावात घडविला ‘सोशल चेंज’

By admin | Published: April 11, 2017 3:42 AM

सोशलमीडियावर युवावर्ग ‘टाइमपास’मध्ये मश्गूल असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून येते; मात्र इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील युवकांनी याच सोशलमीडियाचा वापर

- प्रशांत ननावरे,  बारामतीसोशलमीडियावर युवावर्ग ‘टाइमपास’मध्ये मश्गूल असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून येते; मात्र इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील युवकांनी याच सोशलमीडियाचा वापर करून गावचा शैक्षणिक कायापालट केला आहे. सोशलमीडियाच्या माध्यमातून गावातील शाळा, आरोग्य केंद्रांसाठी ३२ लाखांची कामे पूर्ण केली आहेत. प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता येथील माध्यमिक हायस्कूलकडे युवकांनी मोर्चा वळविला आहे. आता येथील हायस्कू ल डिजिटल करण्यात येणार आहे.‘सणसर विकास मंच’ नावाने या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. या सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुपला नुकतेच २६० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत या समूहातील युवकांनी लोकसहभागातून गावच्या नावलौकिकात भर टाकणारी कामे केली आहेत. त्यामध्ये येथील प्राथमिक शाळेची ३० लाख २७ हजार रुपयांची कामे पूर्ण केली आहेत; तसेच आरोग्य केंद्राचे एक लाखाचे काम सुरू आहे. या युवकांचे काम पाहून बाहेरील अनेक लोक, संस्थांनी विकासकामांना आर्थिक निधी दिला. त्यातून ३० लाखांहून अधिक निधी संकलित होण्यास मदत झाली. सणसरचे काम पाहून आसपासच्या गावांत हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अनेक लोक गु्रपच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावत आहेत.राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वजण एकत्रित आले आहेत. या ग्रुपमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांसह, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य, तरुण मंडळांसह मजूर वर्गदेखील सहभागी आहे. ‘ज्याला जमेल तशी मदत’ या तत्त्वावर सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. साधारण ३२ लाख रुपयांची कामे सर्वांच्या सहयोगामुळे पूर्ण झाली आहेत. सर्वांनी गावातील आरोग्य आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित केले आहे....चौथीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभविद्यापीठाच्या धर्तीवर प्रथमच येथील जिल्हा परिषद शाळेतील ४ थीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्र म राबविला जाणार आहे. मंगळवारी (दि.११) पदवीदान कार्यक्रम होणार आहे. गावातील युवकांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होणार आहे. देशात प्रथमच असा कार्यक्रम होणार असल्याचा दावा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर भोईटे यांनी केला आहे...नो गुडमॉर्निंग... नो गुडनाइट प्लीज‘सणसर विकास मंच’च्या व्हॉट्सअप ग्रुपवर केवळ शाळा, विद्यार्थी, गावच्या विकासाच्या गप्पांना, सूचनांना प्राधान्य देण्यात येते. इतर निरर्थक संदेश पाठविण्यास ग्रुपवर मनाई आहे. गुडमॉर्निंग, गुडनाईटचे संदेश पाठविल्यास त्यास समज देण्यात येते.