येथील रेल्वे कुरकुंभ मोरीच्या परिसरात पी पी किट घातलेले दोन पुतळे उभे करुन कोरोना जगजागृतीचे फलक लावण्यात आले होते. कोरोना संदर्भात भीती पसरेल अशी चर्चा व मेसेज करू नका कारण अधीच नागरीकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे, मदत करता येत नसेल तर शांत रहा. उगाच अफवा पसरून एखाद्याला आयुष्यातून उठवू नका , कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अणखी काही दिवस सोशल डिस्टन्स पाळा व मास्क वापरा . , जास्तीत जास्त कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार झाले पाहिजेत ही सध्याची गरज आहे,
सोशल डिस्टन्स पाळा व मास्क वापरा . असे सामाजिक संदेश असलेला फलक लावण्यात आला होता. सदरचा ऊपक्रम यशस्वी करण्यासाठी झुंज मिञ मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.
--