शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

राज्य राखीव पोलीस जवानांकडून सायकल प्रवासातून समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:29 PM

दौंड ते सिद्धटेक रॅली : पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रम

दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ आणि ५ च्या वतीने पोलीस दिनाचे औैचित्य साधून दौैंड ते सिद्धटेक प्रबोधन सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीतून ‘बेटी बचाव’, ‘निसर्गसंवर्धन’, ‘स्त्रीजन्माचे स्वागत’ यांसह अन्य सामाजिक विषयांबाबत प्रबोधन करण्यात आले. प्रवासादरम्यान सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे फलक सायकलला लावले होते.

समादेशक श्रीकांत पाठक, समादेशक तानाजी चिखले यांच्यासह एसआरपी जवान सायकल रॅलीत सहभागी झाले होते. प्रवासात ठिकठिकाणी ग्रामस्थांना प्रबोधन करण्यात आले. दौंड ते सिद्धटेक मार्गात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. दौंड येथील शिवाजी चौैकात दौंड पोलीस ठाणे, कि. गु. कटारिया महाविद्यालय, कन्या विद्यालय, शेजो विद्यालयाच्या, तसेच अ‍ॅशवुड हॉस्पिटलच्यावतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, डॉ. पी. बी. पवार, शालिनी पवार, प्राचार्य सुभाष समुद्रे, शरद जगताप, आबा मुळे, विकास शेलार, श्रीकृष्ण ननवरे, रामेश्वर मंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.प्रवासादरम्यान स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण हा कार्यक्रमही करण्यात आला. विविध शाळेतील १५०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना शस्त्राची माहितीदेखील देऊनविविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.सायकल चालविणे उत्तम व्यायामआरोग्य सुदृढ राहण्यासाठी सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. तेव्हा सायकलीने प्रवास करून समाजप्रबोधन करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून राज्य राखीव पोलीस दलाचे जवान करीत असतात. पर्यावरणाचा ºहास टाळावा, स्त्रीजन्माचे स्वागत यासह अन्य काही सामाजिक प्रबोधन या रॅलीतून करण्यात आले.- श्रीकांत पाठक, समादेशक ग्रुप क्र . ७निसर्गसंवर्धन गरजेचेपर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही. वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून जवानांच्या माध्यमातून विविध उपक्रमात निसर्ग पर्यावरणाचे संदेश दिले जातात. त्यातूनच निसर्गाचे संवर्धन होत आहे.- तानाजी चिखले, समादेशक : ग्रुप क्र. ५ 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे