शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:27 PM

उमेदीच्या काळात आणि तारुण्यामध्ये समाजसेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वार्धक्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ योजना सुरु केली आहे.

ठळक मुद्देया अभिनव उपक्रमामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांना मिळणार मदतीचा हात पहिल्या टप्प्यामध्ये ५० संस्थांना पाठविण्यात येणार पत्रया कार्यकर्त्यांनी किमान बारा वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून केलेले असावे काम : शैलेंद्र बोरकर

पुणे : उमेदीच्या काळात आणि तारुण्यामध्ये समाजसेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वार्धक्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पैशांअभावी औषधोपचारांपासून दैनंदिन जगण्यातल्या अडचणी भेडसावत राहतात. अशा कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ योजना सुरु केली आहे. या कार्यकर्त्यांना सर्वप्रकारची मदत दिली जाणार असल्याची माहिती कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी दिली. समितीच्या या अभिनव उपक्रमामुळे विविध क्षेत्रांमध्ये निरपेक्ष वृत्तीने काम केलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मदतीचा हात मिळणार आहे. राज्यामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहेत. विविध सेवा कार्यांच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणेची चळवळ राबविण्यात येत आहे. समाजहिताच्या उद्देशाने आयुष्यातील महत्वाची वर्ष दिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना उतारवयामध्ये आर्थिक चणचण भासू लागते. अशा कार्यकर्त्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. जनकल्याण समितीला रा. स्व. संघाच्या एका स्वयंसेवकाने दोन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या देणगीमधून ही मदत केली जाणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले. व्यसनमुक्ती, सामाजिक सुधारणा, महिला सबलीकरण, मुस्लीम सत्यशोधक कार्य, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात काम केलेल्या कार्यकर्त्यांसाठी ही योजना लाभदायी ठरु शकणार आहे. अनेक कार्यकर्त्यांना पैसे नसल्यामुळे दैनंदिन अडचणी भेडसावतात, अनेकांना आजारपणावर औषधोपचार करता येत नाही, शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीत. याचा विचार करुन समितीने या योजनेची आखणी केली आहे. योजना राबविण्यासाठी राज्यभरातील विविध संस्थांना समितीमार्फत पत्र पाठविण्यात येणार आहेत. या संस्थांकडून अशा अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती मागविली जाणार आहे.राष्ट्र सेवा दल, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, वेश्या वस्तीमध्ये करणाऱ्या संस्थांसह ८० संस्था निवडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ५० संस्थांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. यासोबतच वर्तमानपत्र आणि नियतकालिकांमध्ये जाहीरात आणि निवेदनही देण्यात येणार आहे. संस्थांकडून प्राप्त झालेल्या नावांची पडताळणी केली जाणार आहे. या कार्यकर्त्यांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी प्रत्यक्ष भेट घेऊ न, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून पुर्ण खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे खऱ्या गरजू कार्यकर्त्याला लाभ मिळू शकणार आहे. निवडीचे निकष ठरविण्यात आलेले असून वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ दिला जाणार आहे. या कार्यकर्त्यांनी किमान बारा वर्ष पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेले असावे असेही बोरकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPuneपुणे