विभागातील अधिकारी व कर्मचारी हे विविध प्रकारच्या योजना अंमलबजावणीचे काम करतात. त्यासाठी त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांच्या परीने योजना राबविण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, कामाच्या व्यापात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. परिणामी प्रश्न सुटत नसल्याने अधिकारी व कर्मचारी हे चिंतेत व तणावाखाली काम करतात. त्याचा परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर व गतिमानतेवर होत असतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांचे सेवाविषयक प्रश्न वेळेवर विशिष्ट कालमर्यादेत सुटणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्यासाठी कर्मचारी दिन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
--
गुरूवारी कर्मचारी दिन
जिल्हा व प्रादेशिक स्तरावर दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी, तसेच प्रादेशिक स्तरावरील सर्व कार्यालयांसाठी एकत्रित दोन महिन्यांतून एकदा दुसऱ्या गुरुवारी, तर राज्यस्तरीय आयुक्तालय स्तरावर तीन महिन्यांतून एकदा तिसऱ्या गुरुवारी याप्रमाणे कर्मचारी दिन आयोजित करणार आहेत.