पुणे : ढोल-ताशा पथक हे केवळ वादनापुरते मर्यादित नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रातून ५ हजार वादक सैनिकांसाठी रक्तदान करत आहेत. वादनाचा आनंद देण्यासोबतच सामाजिक जबाबदारीदेखील वादक पार पाडत आहेत. वादकांना एकत्र करून सूत्रबद्ध पद्धतीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ढोल-ताशा महासंघ करून देत आहे. वादकांच्या माध्यमातून सामाजिक कार्याची संघटित चळवळ निर्माण होत असून, यातून भविष्यकाळात अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविले जातील, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.महाराष्ट्रातील गणेशोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणाºया ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.स.प. महाविद्यालयात रक्तदान शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संजय सातपुते, भारतीय नौदलाचे विकास पोरावत्री, अॅड. प्रताप परदेशी, नितीन पंडित, इक्बाल दरबार, राजाभाऊ कदम, उदय जगताप, आनंद सराफ, पीयूष शहा, आशुतोष देशपांडे, केतन देशपांडे, प्रकाश राऊत, अतुल बेहेरे, विलास शिगवण, अॅड. शिरीष थिटे, अमोल उंदरे आदी उपस्थित होते. पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.पाच हजार रक्ताच्या पिशव्या संकलनाचा संकल्पपुण्यातील १५० ढोल-ताशा पथकांसह वर्धा, नागपूर, ठाणे, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे ३५ पथके या उपक्रमात सहभागी झाली असून, पाच हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प वादकांनी केला आहे.शिबिरातील रक्तदात्यांची यादी सैन्य रुग्णालयाला पाठविण्यात येणार असून, सैन्यातील जवानांकरिता गरजेच्या वेळी ही तरुणाई रक्तदान करून देशाप्रति असलेले कर्तव्य पार पाडण्याकरिता तत्पर राहणार आहे.गणेशोत्सवाच्या काळात वादकांनी स्वयंशिस्तीने वाहतूक सुरळीत राहील, यासाठी नियोजन करायला हवे. यासाठी प्रत्येक पथकाने स्वयंसेवक नेमून द्यायला हवेत. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुण्याच्या गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे पुणे शहरातून सुरू झालेला हा उत्सव संपूर्ण जगभरात आपण पोहोचवायला हवा.- गिरीश बापट,पालकमंत्री पुणे जिल्हा
वादकांचे सामाजिक भान कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 3:48 AM