शेलपिंपळगाव : प्रत्येक गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी आणणार असून त्यामाध्यमातून समाजोपयोगी कामे मार्गी लावणार असल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार मोहिते पाटील व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे, सभापती विनायक घुमटकर, अरूण चांभारे, सयाजीराजे मोहिते, मयुर मोहिते, वंदना सातपुते, मनीषा टाकळकर, सुजाता पचपिंड, सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच नितीन मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सुनिता मोहिते, मंगल पोतले, सुनंदा औटी, संगिता गायकवाड, आशा मोहिते, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे, निखील मोहिते, मधुकर दौंडकर, विलास मोहिते, पंचायत समितीचे उपअभियंता सुहास जोशी, उपअभियंता बाधकाम विभाग बी.एन. भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले, राज्यात सरकारला कोरोनाबधितांच्या उपचारासाठी करोडो रुपये खर्च करावे लागले. प्रथमदर्शी सरकारने आद्य कर्तव्याला महत्त्व दिले. सध्या कोरोना परिस्थिती सुधारू लागल्याने विकासकांसाठी निधी उपलब्ध होत आहे. या निधींमधून दर्जेदार कामे संबंधितांनी करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अत्यावश्यक निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच विद्या मोहिते तर उत्तम कांबळे यांनी आभार मानले.
१४ शेलपिंपळगाव
शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करताना आमदार मोहिते - पाटील समवेत मान्यवर.